India Languages, asked by RedCream28, 2 months ago

••फाटक्या पुस्तकाची आत्मकथा••
(In Marathi)
Don't Spam××​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
51

एके दिवशी मी माझे कपाट स्वच्छ करीत होतो. माझ्या आजूबाजूला अनेक पुस्तके पडली होती. त्यातच मला एक जुने पुस्तक मिळाले ज्यात महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला होता. त्या पुस्तकाची स्थिती खराब होती. मी त्याला स्वच्छ करून वाचतच होतो इतक्यात पुस्तक बोलू लागले. मी थोडा घाबरलो हे कसे शक्य आहे. पण त्याने मला धीर देत म्हटले, "घाबरू नकोस, मला तुझ्याशी फार दिवसांपासून बोलण्याची इच्छा होती मी तुला माझी आत्मकथा सांगू इच्छितो." 

पुस्तक मला सांगू लागले माझा जन्म एका कारखान्यात झाला होता माझ्या पानावर महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला आहे. मला या गोष्टीचा फार अभिमान आणि आनंद देखील होता. या नंतर मला एका वाचनालयात पाठवण्यात आले वाचनालय मध्ये असताना मला वाटायला लागले कि माझ्या पानांवर छापलेला इतिहास वाचण्यासाठी लोक पळत येतील, परंतु असे काहीही झाले नाही. लोकांना माझ्यात असलेल्या इतिहासात सारस्य नव्हते. मग काय मी वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहिलो. मी वाट पाहत होतो कि कोणीतरी येऊन मला नेईल. 

शेवटी मला वाटायला लागले कि माझे आयुष्य याच वाचनालयात धूळ खात संपून जाईल. तेव्हाच मला शोधत तू आला, मला खूप आनंद झाला. तू मला घरी घेऊन आला व माझ्या पानांवर छापलेला इतिहास मोठ्या आनंदाने वाचू लागला. मी पुन्हा आनंदित झालो मला वाटायला लागले कि मला खूप चांगला मालक मिळालेला आहे.

माझ्या इच्छेनुसार काही दिवस तर तू मला अतिशय मन लावून वाचले. पण त्यानंतर तू मला एका टेबलावर ठेऊन विसरून गेलास. तेथे माझ्यावर पाणी पडले. मी ओला झालो, पण तुझे माझ्यावर लक्ष नव्हते. तुझ्या आईने स्वछता करीत असताना मला उचलून कपाटाच्या वर ठेऊन दिले. तेव्हा पासून तर आजपर्यंत मी तेथेच पडलेलो होतो. 

मला खूप वाईट वाटत होते. तेथे पडून पडून माझे पाने मोकळे होऊ लागले. मला वाटले कि लवकरच माझा अंत होईल. पण आज तू येऊन मला वाचवले. पुस्तकाला एका गुरु प्रमाणे मानले जाते. ज्याप्रमाणे तू आपल्या गुरूचा सम्मान करतो त्याच प्रमाणे माझा तसेच इतर पुस्तकाचा पण सम्मान करत जा. जर तू मला वाचून संपवले असेल तर मला आपल्या मित्रांना भेट देऊन त्यांचेही ज्ञान वाढव.

पुस्तकाने माझ्याशी साधलेल्या या संवादानंतर मी देखील पुस्तकांची योग्य देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला.

________________________________

I hope it is helpful for you..

Jai Maharashtra

Answered by Anonymous
3

मित्रमैत्रिणींनों, आपल्या सर्वांनचेच पुस्तकांशी नाते हे बालपणीपसूनचेच असते. अशाच एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त किंवा फाटक्या पुस्तकाची आत्मकथा आज आपण बघणार आहोत.

नेहमीप्रमाणे शालेय दिवस होता. परंतु प्रत्येक शनिवारी आमचा लायब्ररीमध्ये जाण्याचा तास असतो. ज्या दिवशी लायब्ररीचा तास असतो त्या दिवशी आम्ही सगळी मुले एका रांगेने लायब्ररीत जातो आणि शिक्षक आम्हाला एक एक गोष्टीचे पुस्तकं पुढील एका आठवड्यासाठी वाचायला घरी न्यायला देतात.

दरवेळी मला उत्सुकता असते कीं मला कोणते पुस्तकं मिळेल? मला जादूच्या गोष्टीची पुस्तके वाचायला खूप आवडतात. मला जादूच्या गोष्टीचेच पुस्तकं हवे होते. परंतु मला बोधकथांचे पुस्तकं मिळाले त्यामुळे माझा थोडासा हिरमोड झाला.

मला मिळालेलं पुस्तकं मी तसाच दप्तरात टाकून घरी आलो. रात्री घरी जेव्हा गृहपाठ करून झाला तेव्हा माझी नजर मला मिळालेल्या गोष्टीच्या पुस्तकावर पडली. जुनाट, काळपट झालेलं ते पुस्तकं बघून मला त्याचा खूप राग आला आणि रागाच्या भरात मी ते पुन्हा दप्तरात भरायला गेलो तेवढयात माझ्या कानावर एक आवाज ऐकायला आले, ' अरे बाळ! नको रे माझा असा राग राग करुस! ' आणि मी पटकन दचकलो आणि त्या पुस्तकाकडे बघू लागलो.

तेवढ्यात ते पुस्तकं म्हणाले, 'होय! मी पुस्तक बोलतोय!' आज तुझ्याशी मला थोडे बोलायचे आहे. मी हा असा काळा, मळकट आणि फटका आहे म्हणून तुला मी आवडतं नाही ना? परंतु मी पहिला असा नव्हतो. मी ही इतर नवीन कोऱ्या पुस्तकासारखा सुदंर, गोरापान आणि छान चित्रे असलेले मुखपृष्ठवाल्या रूपाचा होतो. छपाई कारखान्यातून मी खूप सुंदर प्रकारे छापून आलो होतो. माझे प्रत्येक पान कोरे आणि करकरीत होते. माझे एक एक पान पुढे पुढे सरकावताना त्याचा होणारा कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज मला खूप नवेपणा देत असे.

पुढे मी छपाई कारखान्यातून विक्रीसाठी पुस्तकांच्या दुकानात जाऊन बसलो. माझ्या प्रत्येक पानावर एक बोधकथा लिहिली आहे हे मला माहित आहे ज्यात तुझ्यासारख्या माझ्या छोट्या दोस्त मंडळींना खूप चांगल्या सवयी गोष्टीच्या रूपाने शिकवणाऱ्या आहेत. म्हणून तुझ्या शाळेने मला तुमच्या लायब्ररीमध्ये आणून ठेवले.

पुस्तकंच्या दुकानातून शाळेच्या लायब्ररीपर्यंतचा माझा प्रवास मी खूप कुतूहलाने केला. लायब्ररीत आल्यावर मात्र मला अजून आनंद झाला कारण तिकडे माझ्यासारखे अजून खूप वेगवेगळे मित्र मला मिळाले. काही नवे तर काही जुने, काही माझ्यासारखे कोरे कर्करीत तर काही खूप फाटके अशी खूप पुस्तके त्या रांगेत ठेवली होती आणि तिथेच मला पण एक जागा मिळाली.

मी तिथे बसून बसून बघत असे काही काही पुस्तके नेली जात असत तर काही गेलेली परत आणून ठेवली जात असत. मला पण उत्सुकता होती कीं आपण असे कधी कोणत्या छोट्या विद्यार्थ्यांकडे वाचणासाठी जाणार आणि एक दिवस ती वेळ आली.

मला पण तुझ्यासारखाच एक छोटा दोस्त त्याच्या घरी वाचनासाठी घेऊन गेला. त्यांच्या दप्तरात मी खूप खुश होतो. त्याने घरी जाऊन त्याच्या आईला दाखवले कीं मी किती कोरा आणि छान आहे. त्याला त्याच्या आईने माझ्या प्रत्येक पानावरील सुंदर सुंदर गोष्टी वाचून दाखवल्या. त्याने माझी खूप काळजीपूर्वक हाताळणी केली.

 मी त्याच्याकडे खूप खुश होतो परंतु त्याच्याकडून मला आता दुसऱ्या दोस्ताने वाचायला नेले. आणि त्या मुलाने घरी जाऊन एक दोन गोष्टी वाचुन मला तिथेच फेकून दिले. मी दिवसभर एका कोपऱ्यात पडून होतो आणि तो बाहेर खेळायाला गेला. थोड्या वेळाने तो पुन्हा खात खात मला वाचू लागला त्याच हाताने माझी पाने उलटू लागला त्यामुळे त्याच्या हातातील खाणे माझ्या पानांना लागले आणि डाग पडले. 

पुढील एक दोन गोष्टी तो तसाच कामे करता करता, खेळता खेळता आणि खाता खाता वाचत राहिला आणि जशी त्याला झोप आली तसें त्याने पटकन माझ्या एका पानाचे टोक मोडले आठवण म्हणून कीं तो कुठपर्यंत गोष्ट वाचून झालाय ते लक्षात राहावे. जसे त्याने माझे पानाचे टोक मोडले तशा मला खूप वेदना झाल्या. बघता बघता मी मळका, फाटका आणि काळपट झालो.

पुढे असेच एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे मी जात राहिलो आणि कोणी त्यावर स्वतःचे नाव लिहीत असे तर कोणी त्यावर खेळ खेळीत असे. एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात असे किती तरी वेळा माझे हाल झाले.

मी बोधकथांचे पुस्तकं आहे. माझी अपेक्षा हीच आहे कीं तुम्ही मुलांनी माझ्या प्रत्येक पानावरील कथेमधून काही ना काही चांगले बोध घ्यावे परंतु तुम्ही मला व्यवस्थितपणे न हाताळता माझे हाल करीत आहात.

आज मी तुझ्याकडे आलोय तर तू ही माझा राग केलास कारण मी मळकट झालो आहे परंतु तुझ्यासारख्याच एकदोन छोट्या मित्रानीं मला असे केलेलं आहे. आता मी एवढा फटका झालोय कीं थोड्या दिवसांनी सगळे मला आता रद्दीच्या दुकानात देऊन टाकणार. तिथून कदाचित माझा प्रवास अजून वेगळा आणि भयावह होता जाईल. तिथून मी एखाद्या दुकानवाल्याकडे किंवा भेळवाल्याकडे जाईन ज्यात ते आपलें जिन्नस माझ्या पानांमध्ये बांधून त्यांच्या गिऱ्हाईकाला देतील आणि त्याहून पुढे जाऊन माझी जागा एखाद्या कचरा कुंडीत झाली असेल. असा हा माझा जीवनप्रवास जो छपाई कारखान्यातून सुरेख कोरा अशाप्रकारे सुरु झालेला होता तो शेवटी कचरा म्हणून संपून जाईल.

तेव्हा तुम्हा मुलांकडून माझी एकच अपेक्षा आहे कीं आम्ही पुस्तके तुम्हाला ज्ञान देतो, विरंगुळा देतो आणि बोध देतो त्याचा तुम्ही आदर करा आणि आपल्या पुढील जीवन सुखकर करण्यासाठी आमचा पुरेपूर उपयोग करून घ्या.

पुस्तके ही खूप मौलिक संपत्ती आहे तिचा एकापासून दुसऱ्यापर्यंत चांगल्या स्थितीत पोचवण्यासाठी मदत करा. असे बोलून तो गप्प झाला आणि माझा माझ्या या पुस्तकाची खरी किंमत कळली.

Similar questions