फरक स्पष्ट करा भारतातील लिंग गुणोत्तर आणि ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर
Answers
भारतातील लिंग गुणोत्तर म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मागील स्त्रियांची संख्या होय
Answer:
ब्राझील आणि भारतातील लिंग गुणोत्तरात फरक आहे.
Explanation:
ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर:
१. गेल्या अनेक वर्षांपासून ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर १००० पेक्षा जास्त आहे.
२. ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी अनुकूल आहे.
३. १९६१ ते २००१ च्या कालावधीत ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर हे १०१० ते १०२० च्या दरम्यान आढळते.
४. २००१ पासून ब्राझीलमधील स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
५. २०११ साली ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर १०९० होते.
भारतातील लिंग गुणोत्तर:
१. गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील लिंग गुणोत्तर १००० पेक्षा कमी आहे.
२. भारतातील लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी प्रतिकूल आहे.
३. १९६१ ते १९९१ या कालावधीत भारतातील लिंग गुणोत्तरात ९२० ते ९४० च्या दरम्यान बदल आढळतो.
४. १९९१ पासून भारतातील लिंग गुणोत्तर वाढले आहे.
५. २०११ साली भारतातील लिंग गुणोत्तर ९४७ होते.
अधिक माहिती:
१. लिंग गुणोत्तर:
एखाद्या प्रदेशात एक हजार पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय.
२. लिंग गुणोत्तर जास्त किंवा कमी असणे प्रतिकूल असते.
३. लिंग गुणोत्तर हे नेहमी समान असणे देशाच्या विकासास अनुकूल असते.