India Languages, asked by mdjagtap1973, 9 months ago

farewell speech in marathi​

Answers

Answered by pooh022
0

Answer:

Amchi farewell ahe udaya mi pahile ti attend karun yete mag tula information deil sagla

Answered by bestanswers
3

निरोप समारंभ - भाषण  

मी मिताली जोशी; शाळेचे  मुख्याध्यापक , शिक्षक आणि उपस्थित माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणी या सर्वांचे अभिष्टचिंतन करते. आज आपण इथे दहावीच्या निरोप समारंभाला जमलो आहोत. नववीच्या सगळ्या मुलामुलींचे मी आभार मानते कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन आजच्या या सोहळ्यासाठी हे सभागृह सजवले आहे.  

आतापर्यंत आपण सगळे मिळून शिकलो, कधी भांडलो कधी मारामाऱ्या केल्या. या सगळ्या आठवणी आपल्याला आयुष्यभर पुरतील. इथून पुढे आपण सगळे आपल्या आयुष्याच्या नवीन वळणावर प्रवास करणार असू, तिथे कदाचित आपल्याला निराशा, क्लेश, संताप अशा गोष्टी अनुभवाला येतील. तेव्हा मात्र या शाळेच्या गोड आठवणी आपल्याला नवीन बळ देतील.  

सगळ्या शिक्षकांनी आपल्याला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले आणि आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्याला सतत मेहनत घेण्याची प्रेरणा दिली. आपल्याला घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.  

सगळ्याचे पुन्हा एकदा आभार मानते आणि माझे मनोगत संपवते.  

धन्यवाद .

Similar questions