फटाके मुक्त सण उत्सव मराठी निबंध 500 ते 600 शब्दांत
Answers
Answer:
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण फटाके वाजवत,धमाल करत सण साजरा करतात.पण आपण कधी विचार केलाय,की या फटाक्यांचा आपल्या वातावरणावर व शरीरावर किती परिणाम होतो.
फटाक्यांमुळे वातावरण प्रदूषित तर होतोच पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यावर ही यांचा गंभीर परिणाम होतो.फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनि प्रदूषण होतो तसेच लोकांना आणि जनावरांना देखील त्रास होतो. फटाक्यांमुळे कचरा निर्माण होतो.त्यांच्यामुळे घसा,नाक आणि डोळ्यांसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.हृदय,श्वसन व मज्जासंस्था विकारासारखे गंभीर परिणाम ही होऊ शकतात.जास्त धुरामुळे धुरके निर्माण होण्याची भीती असते.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण फटाके मुक्त सण साजरे केले पाहिजे.फटाके वाजवणे बंद किंवा कमी केले पाहिजे.फटाक्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा,तेच पैसे गरजू लोकांना मिठाई,नवीन कपडे,आवश्यक वस्तू घेण्यात खर्च केले पाहिजेत.फटाके वाजवण्यापेक्षा आपण त्याच वेळात आपल्या नातेवाईकांना,मित्र परिवाराला भेटून आनंदाने सण साजरे केले पाहिजे.फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली पाहिजे.
अशा प्रकारे,फटाके मुक्त सण साजरे करून आपण वातावरणाला आणि आरोग्याला वाचवू शकतो आणि इतरांसाठी एक चांगले उदाहरण प्रस्थापित करू शकतो.