History, asked by deepaliwalia7469, 1 year ago

forest information in marathi

Answers

Answered by RashidArshad
0
जंगल म्‍हणजे काय रे भाऊ – असा प्रश्‍न विचारला तर बहुतेक जण विनोदाने हसतील. त्‍यांच्‍याकडे तयार उत्‍तरेही असतील. अरे जंगल म्‍हणजे झाडं… थोडेसे प्राणी, आणि थोडेसे पक्षीबिक्षी. किंवा एखादा फार ठामपणे उत्‍तर देईल – ज्‍या जंगलात वाघ किंवा बिबट्या नाही, ते जंगल काही खरे नाही. वाघाशिवाय जंगल असूच शकत नाही. मग कॉर्बेट, ऑर्वेल, किपलिंग आणि आपल्‍या चितमपल्‍लींच्‍या लिखाणातले दाखले वगैरे येतील. मात्र एका गोष्‍टीकडे आपण सगळे दुर्लक्ष करू. या सगळ्यांच्‍या कथांमध्‍ये स्‍थानिक लोकांची म्‍हणजे जंगलातल्‍या माणसांची नावं येतील, त्‍यांनी या दिग्‍गज लेखकांना काय काय माहिती पुरवली हेही येईल. बाकी सगळं आपल्‍या लक्षात राहतं, पण जंगलात तिथेच कायमची राहणारी माणसं होती – हे आपल्‍या डोक्‍यात मुळीच उतरत नाही.

राजेश हा आमचा मुंबईतला मित्र. कट्टर पर्यावरणप्रेमी. परवाच त्‍याचे इमेल होते, ‘चिमण्‍या वाचवा, आपल्‍या बाल्‍कनीत पाणी ठेवा, दाणे ठेवा’. अशा ब-याच इमेल तो पाठवत असतो. उत्‍साहाने कुठल्‍या कुठल्‍या जंगलात फिरत असतो आणि तिथले फोटोही पाठवत असतो. त्‍याच्‍या जीमेल स्‍टेटस मध्‍ये सुध्‍दा ‘बिबट्या वाचवा, जंगल वाचवा’ अशा काय काय घोषणा असतात. तोसुध्‍दा तुमच्‍या आमच्‍या सारखा ऑफिशियल जंगलांमधेच फिरलेला आहे. त्‍याच्‍या दृष्‍टीने जंगल म्‍हणजे नॅशनल पार्क किंवा अभयारण्‍य – जिथे वनविभागाच्‍या कृपेने छान टूरीस्‍ट कॉटेज असतात, मचाण किंवा जीपांमधून फिरता येतं, बोटिंग/फिशिंग करता येतं, आणि व्‍हेज-नॉनव्‍हेज दोन्‍ही मेनूकार्ड असतात. जंगलात फक्‍त बिस्किटे आणि ‘कुरकुरे’ खाऊन मी कसा फिरलो, याच्‍या कहाण्‍याही तो सुरसपणे सांगतो.

एकदा काय झाले, राजेशला आम्‍ही ख-या जंगलात नेले. जिथे रस्‍ता, वीज, आणि नळाचे पाणी अद्याप पोचलेले नाही, शाळेतून संध्‍याकाळी परतायला उशीर झाला तर मुलांना तरस आणि बिबट्याचे भय असते, आणि रात्री खरंच अंधार असतो! पावसाळ्यात जिथे साप-विंचू घरात येतात आणि एकुलती एक बकरी बिबट्याच्‍या तोंडातून ओढून काढण्‍यासाठी गावकरी झटपटतात… अशा जंगलात.

चिवट नागलीची भाकरी, उडदाची डाळ आणि उकडलेले कंद – राजेशला हे काही खाववेना. त्‍या जंगलात जेमतेम 10 तास राहिल्‍यावर राजेश मला म्‍हणाला, ‘‘अरे ही माणसं इथे राहतातच कशाला, किती गैरसोय आहे इथे. त्‍यापेक्षा हे मुंबईत का नाही येत?’’ जंगलात माणसं सुध्‍दा असतात हे राजेशच्‍याच काय पण आपल्‍या कोणाच्‍याच फंड्यात नसतं. अगदी कॉर्बेट ते चितमपल्‍ली सगळं वाचून सुध्‍दा ती माणसं आपल्‍याला कधी जाणवत नाहीत. जंगलाच्‍या जीवचक्रात या माणसांचेही महत्‍वाचे स्‍थान असते.


RashidArshad: follow me plz
Similar questions