formal and informal letter format in marathi
Answers
Answered by
10
।। श्री ।।
प्रिय सजिथा हिंस,
शि. सा. न. वि. वि.
पत्र लिहिण्यास कारण कि, मराठी भाषेतील अनौपचारिक पत्रव्यवहार कसा असतो, हे जाणून घेण्याची आपली इच्छा आहे असे समजले.
अशा पत्रातील मजकूर कसा असावा ह्यावरती कसलेही बंधन नसले, तरीही थोरा मोठ्यांची चौकशी, लहानांना आशीर्वाद देण्याची रीत आहे.
ह्या व्यतिरिक्त, स्वतःची खुशाली देखील योग्य शब्दांत लिहावी.
पत्रातील भाषा सोपी व गोड असावी. शुद्धलेखनाच्या चुका कमीतकमी असाव्यात. जेणेकरून पत्र वाचणाऱ्यास आनंद होईल व गैरसमजूत होणार नाही.
मला वाटते एवढे विवेचन पुरे. हे पत्र वाचून आपले अंशतः का होईना, पण शंकानिरसन होईल अशी आशा बाळगतो.
कळावे लोभ असावा.
आपला विश्वासु,
निखिल
ता. क. - चुक भुल द्या घ्या.
Answered by
4
Answer:
साष्टांग नमस्कार विनंती विशेष
Explanation:
सा.न.वि.वि
साष्टांग नमस्कार विनंती विशेष
Similar questions