India Languages, asked by TransitionState, 1 year ago

गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, दहीहंडी, मराठी माहिती...

Answers

Answered by linga45
0

keep in English I will say the answer

Answered by halamadrid
0

Answer:

श्रावण वैद्य अष्टमीला मध्यरात्री मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.म्हणून हा दिवस गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी मंदिर सजवतात,कृष्णाची मूर्ती सजवतात.भजन,प्रवचन,कीर्तन आयोजित केले जाते.वैद्य अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्मोत्सव सोहळा आयोजित केला जातो.श्री कृष्णाच्या मूर्तीला स्नान घालतात,त्यानंतर त्या मूर्तीला वस्त्र आणि दागिने घालून तिची पूजा केली जाते. तिला सजवलेल्या पाळण्यात ठेवून, पाळण्याला झोका दिले जाते.पाळणा म्हटला जातो. श्रीकृष्णाला दही,दूध,पोहे, साखर,यांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी उपवास ठेवला जातो जो दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहीहंडीला सोडला जातो.

लहानपणी श्रीकृष्ण यांना दही,लोणी फार आवडत असे,ते चोरुन ते खात असे.म्हणून यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी ठेवत असे.हंडी पर्यंत पोहोचण्यासाठी कृष्ण मित्रांची मदत घेत एकावर एक थरं लावायचे.या गोष्टीची आठवण म्हणून दहीहंडी साजरी करतात.

जागोजागी दहीहंडीचे कार्यक्रम ठेवतात. एका मडक्यात लोणी,दूध,दही,ताक टाकून ही दहीहांडी उंचीवर बांधली जाते.मुले एकावर एक चढून,थरं लावत ही हंडी फोडतात.

गोकुळाष्टमी सगळीकडे आनंदाने व उत्साहाने साजरा केली जाते.

Explanation:

Similar questions