Hindi, asked by ankushraut2391, 1 month ago

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सुर्य , चंद्र, तारे काव्यपक्ती चा अर्थ​

Answers

Answered by sayaligaonakr4
144

कवी अस सांगत आहेत की गे मायभू म्हणजे मातृभूमीला तुझे मी फेडीन पांग सारे पांग म्हणजे उधारी/उपकार मी फेडणार आहे तुझी आरती करताना मी आकाशातील ते सुवर्ण सुर्य , चंद्र , तारे आणणार आहे म्हणजे तुझ्या आरतीला मला जे करता येईल ते मी सर्व गोष्टी करणार आहे

Answered by rajraaz85
0

Answer:

गे मायभू या कवितेचे कवी सुरेश भट हे आहेत. कवीने या कवितेत मातृभूमीविषयी असलेली भावना व्यक्त केलेली आहे.

जसे आपल्या जन्मदेत्या आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. अगदी त्याचप्रमाणे या मातृभूमीचे देखील आपल्यावर अनंत उपकार अाहेत. कवी मायभूमीला सांगत आहेत मी तुझे उपकार फेडण्याचा प्रयत्न करीन माझ्या जन्माचे सार्थक करीन. कवी मातृभूमीला सांगत आहेत हे मातृभूमी तुझी आरती करण्यासाठी मी सूर्य चंद्र आणि तारे या सर्वांना आणेल.

हे भू माते मी जरी आयुष्यात कितीही मोठा झालो तरी तुझ्यापेक्षा लहानच राहील. तुझ्यामुळे माझ्या जन्माला अर्थ मिळालेला आहे. कवींनी या कवितेत मातृभूमी विषयी असलेला आदर व गौरव व्यक्त केलेला आहे.

कवींची मातृभूमी विषयीची असलेली कळवळ या कवितेत दिसून येते.

Similar questions