गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा.
Answers
Hindi samajh nahi aayi handwriting thik karo
★उत्तर - सजीवांच्या पेशींकेंद्रात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय.
गुणसूत्रांचे प्रकार
1)माध्यकेंद्री - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो व हे ' V 'या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात.
2)उपमाध्यकेंद्री - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू माध्याच्या जवळपास असतो व हे 'L' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते.
3)अग्रकेंद्री - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असतो व हे ' j ' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते.
4)अंत्यकेंद्री - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाला असतो व हे ' i ' या इंग्रजी मुळाक्षरासारखे
दिसतात. यात एकच गुणसूत्र भुजा असते.
धन्यवाद...