ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
Answers
ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
उत्तर :-
१) ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या ग्रंथांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणे महत्वाचे असते, त्यामुळे ग्रंथालयात असणारी विविध पुस्तके कोणत्या रकान्यात ठेवलेली आहे हे लवकर शोधाता येते.
२) ग्रंथांच्या पद्धतशीर रचनेमुळे वाचकांना हवी असणारी ग्रंथ लगेच शोधता येते.
३) त्यामुळे ग्रंथालय व्यवस्थापक व वाचक या दोघांचाही वेळ वाचतो.
४) एकाच प्रकारच्या ग्रंथांचा संग्रह ना होता निरनिराळ्या ग्रंथांची ग्रंथालयात व्यवस्थित नोंदी ठेवता येते , तसेच वाचकांना भरपूर ग्रंथ वाचनास उपलब्ध होतात.
५) उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची नावे, सूची,अनुक्रमणिका, संगणकीय प्रणाली व अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात.
६) ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरविणे, जाहिराती करणे, व फी मध्ये सवलत देणे या सर्व गोष्टींमुळे मदत होते तसेच लोकांना वाचनाची आवडही निर्माण होते.