CBSE BOARD X, asked by manjuabhishek1128, 7 months ago

'गोट्या' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?​

Answers

Answered by ashayjain
1

Answer:

गोट्याचे नाव कुणाला माहीत नाही? या मुलाने अख्ख्या महाराष्ट्रात गडबड उडवून दिली. त्याची कल्पकता, चौकसवृत्ती, धाडस, खेळकरपणा, वक्तृत्व, एक ना दोन शेकडो गुणांमुळे तो खेळगड्यांचा आवडता झाला आहे.

आणि त्याच्या बरोबर आहे त्याची उपद्व्यापी आणि धडपडी बहीण!

========

कुणा छोटाशा कोकणातल्या खेडात काका-काकूंसोबत राहणार्‍या विश्वासची ही गोष्ट. आईबापाविना वाढणारा, कजाग काकूच्या तावडीत सापडलेल्या विश्वासचा प्रवास कोकणातून सुरू होतो. काका-काकू आपल्यावरची जबाबदारी टाळण्याकरता आणि पैशाच्या हव्यासापायी या छोटा विश्वासला एका खानावळीच्या मालकाकडे नोकर म्हणून सोपवतात. शाळा, अभ्यासाची गोडी आणि उपजत कुतूहल असणारा हा विश्वास, या खानावळीत आपल्या लाघवी वागण्याने, अश्रापत खोडांनी आणि नकळत घडणार्‍या चुकांनी कधी लाडका तर कधी नावडता होत राहतो. एक धम्माल गोष्टच सांगतो. नजीकच्याच मोटारतळावरचे उतारू खानावळीत गिर्‍हाईक म्हणून येतात. गरम पुरी-भाजीची ऑर्डर देतात. नोकराचं काम करणारा विश्वास त्यांना पुरी-भाजीच्या बश्या आणून देतो. मात्र पदार्थ गारढोण असतात. गिर्‍हाईक त्याच्यावर रागावतात. मी गरम पुरी-भाजी मागितली असं ठणकावतात. निरागस आत्मविश्वासाने विश्वास उत्तर देतो की, पुरीभाजी काल सकाळी केली तेव्हा गरमच होती. बारा तास अगोदर आला असतात तर नक्कीच उकळत्या तेलातून काढलेली पुरी वाढली असती. याच चुकीपायी खानावळीच्या मालकाचा, भररस्त्यात बेदम मार खात असताना, एक सहृदय गृहस्थ या विश्वासला आपल्या पंखांखाली घेतात. आपल्या घरी घेऊन जातात. तिथे विश्वासला त्याची धाकटी बहीण सुमा भेटते. आईची माया देणारी माई मिळते. या घरात विश्वास रुळतो, रमतो, वाढतो आणि खूप मोठ्ठा होतो. त्याच्या नव्या घरात रुळत असतानाची एक गोष्टदेखील माझ्या कायम स्मरणात राहिलेली आहे. नुकत्याच शाळेत जाऊ लागलेल्या विश्वासला रोज नवनव्या गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्यातच त्याने शंकर-पार्वतीची, गणपतीच्या जन्माची गोष्ट ऐकली. या गोष्टीवर त्याची प्रतिक्रिया, त्याने उपस्थित केलेले प्रश्न फारच गंमतशीर आहेत. पार्वतीने अंगावरच्या मळातून गणपतीची निर्मिती केली, तेव्हा तिने वर्षांनुवश्रे अंघोळ केलेलीच नसली पाहिजे, त्याशिवाय छोटा गणपतीची निर्मिती होईल इतका मळ कसा जमेल तिच्या अंगावर? हा गोटाचा प्रश्न त्या लहान वयात माझ्या मनातही आला होता. मात्र हा प्रश्न विचारण्यातलं त्याचं चिमुकलं धाडस मला त्या वेळी अधिक भावलं होतं. संस्कार, गुणग्राहकता, मूल्य, विचारीपणा, कुतूहल, अभ्यास यांसारख्या गोष्टी अनेक धम्माल प्रसंगांतून, छोटा संवांदांतून समोर येतात. अगदी नकळत गोटाची हुशारी, आत्मविश्वास, अभ्यासूपणा, चतुरपणा, चाणाक्षपणा आणि दुर्दम्य ध्येय आपल्यामध्ये रुजत जातात.

लोकसत्ता २१ फेब्रुवारी २०१६

Answered by sunitaborse1985
1

Answer:

ना.धो.ताम्हणकर या पुस्तकाचे लेखक आहेत.

Similar questions