गोठा
साफ करताना डेबुजी काय म्हणत
Answers
Answer:
Heya Jii...
Explanation:
डेबूजीचे गोवारी जीवन :
डेबूजीने रोज मोठ्या पहाटे उठावे, गोठा साफ करावा, शिळ्या भाकरीचा तुकडा चावून वर घोटभर पाण्याने न्याहारी करावी, दुपारच्या जेवण्यासाठी दिलेली कांदा भाकरीची पुरचुंडी बगलेच मारावी आणि गाई - म्हशी - बैल चरणीला घेऊन जावे. माध्यान्हीला सूर्य आला का गुरांना पाणी पाजून त्यांना सावलीत बसवायचे, आपण भाकर खायची नि राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि भजने गात जवळच लवंडायचे. कित्येक वेळा गुरे डेबूजीची नजर चुकवून शेजारच्या शेतात घुसायची. राखणदार तणतणत यायचा. डेबूजी त्या गुराला वळवून आणून, त्याची हात जोडून क्षमा मागायचा. या त्याच्या विनम्र वृत्तीला इतर गवारी पोरे टिंगलीने हसायची. एकाद वेळी राखणदाराची चपराक ही तो मुकाट्यने सहन करायचा. पण उलट शब्द कधी बोलायचा नाही. गुराढोरांची जोपासना डेबूजी स्वतः पेक्षा विशेष अगत्याने करायचा. वेळी आपण भाकर खायला विसरेल, पण गुरांची दाणा वैरण वेळच्या वेळी द्यायला एकदा ही चुकला नाही. सकाळ संध्याकाळची त्याची गोठे सफायी पाहून शेजारी पाजारी चकित व्हायचे. ४ - ५ दिवसांआड गुरांना नदीच्या पाण्यात घालून चांगली मालीश करी. त्यामुळे चंद्रभानजीची गुरे म्हणजे दापुरीत नमुनेदार म्हणून जो तो वाखाणू लागला.