गाय या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
10
गाय म्हणजेच 'गोमाता'. गाईला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. गाय ही पाळीव प्राणीआहे. गायीचे पुजनहि केल्या जाते. गाय वेगवेगळ्या रंगाची असते. गाईचे शरीर मोठे असून चार पाय, एक लांब शेपटी, दोन शिंगे, दोन कान, दोन डोळे व तोंड असते. भारतात जवळपास गायींचे अठ्ठावीस प्रकार आहेत. गाईच्या पिल्लाला 'वासरू' म्हणतात. स्वतःच्या संरक्षणासाठी गाईला दोन शिंगे असतात. गाईचे दूध व त्यापासून बनणारे पदार्थ जसे की दही, ताक, पनीर फार पौष्टिक असतात. गाईचे गोमुत्त्राचा सुद्धा औषध म्हणून उपयोग होतो. शेणाचा वापर शेतात खतांसाठी तसेच घरसारवण्यासाठी होतो. पूर्वीच्या काळात राजे महाराजे ब्राम्हणांना गाई दानत देत असत. कारण गाईला सोन्याइतकेच मूल्यवान समजले जाई. गाईला हिरवापाला, चारा, गवत, तसेच अन्न- धान्याचा कोंडा खायला आवडतो. गाय हि एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.
Similar questions