पर्यावरणाचे संरक्षण या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
1
आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व गोष्टी जसे की प्राणी, पशू-पक्षी, पाणी, झाडे, नद्या, हवा म्हणजेच पर्यावरण होय. आपल्या निरोगी व स्वच्छ आरोग्यासाठी व जीवनासाठी पर्यावरणाची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पर्यावरणाचा समतोल ढासळला तर जीवन जगणे अशक्य होईल. दुष्काळ, पूर, वादळे, पावसाची अनियमितता असे वारंवार परिणाम भोगावे लागतील. म्हणूनच आपल्या घराजवळचा व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याचा वापर सांभाळून करावा. जास्तीत जास्त झाडे लावावीत व त्यांची काळजी घ्यावी. घरातून, कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. रासायनिक खतांचा वापर टाळावा. तरच आपण पर्यावरणाचे संरक्षण चांगल्या पद्धतीने करू शकू.
Similar questions
Geography,
6 months ago
Science,
6 months ago
India Languages,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago