India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

झाडांचे महत्त्व या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
13

आपल्याला स्वच्छ व निरोगी पर्यावरणासाठी तसेच मानवी आरोग्यासाठी झाडे अत्यंत महत्त्वाचे आहे. झाडे सजीवांना जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन पुरवितात. पशू-पक्षी, जनावरांना राहण्यासाठी असरा देतात. मनुष्याला उन्हापासून संरक्षणासाठी सावली देतात. फळे, फुले व अन्न बनतात. झाडांचे लाकूड स्वयंपाकासाठी, इमारती बांधण्यासाठी तसेच टेबल-खुर्ची, दार,पलंग  बनविण्यासाठी होते. झाडे ही हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत करतात. तसेच ध्वनिप्रदूषण मर्यादित करण्यासाठी झाडे मदत करतात. झाडांचे महत्त्व सांगावे तेवढे कमीच आहे, म्हणून प्रत्येकाने झाडे लावावीत व प्रौढ वृक्षांची सुद्धा काळजी घ्यावी.

Answered by halamadrid
7

■■ झाडांचे महत्व■■

झाडे निसर्गाच्या मौल्यवान घटकांपैकी एक आहेत. झाडे खूप महत्वपूर्ण असून, त्यांचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये केला जातो.

झाडांचे बरेच फायदे आहेत. झाडाचा प्रत्येक भाग कशा न कशा प्रकारे तरी उपयोगी ठरतो. झाडे आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन, खाण्यासाठी फळे, कडक उन्हात सावली, पक्ष्यांना राहण्यासाठी आश्रय, जनावरांसाठी खाऊ उपलब्ध करून देतात.

झाडांच्या फुलांचा,पानांचा उपयोग सजावटीसाठी केला जातो, तसेच त्यांच्यातील औषधी गुणधर्मांमुळे, त्यांचा वापर औषधे तयार करण्यासाठी केला जातो. झाडांच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, कागद, साधने, शस्त्रे बनवण्यासाठी केला जातो.

झाडे वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात.वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करून झाडे जागतिक तापमान वाढ कमी करण्यात मदत करतात.झाडांमुळे हवा शुद्ध व ताजी होते. त्यांच्यामुळे, पावसाचे प्रमाण वाढते.

अशा प्रकारे, झाडे बहुउपयोगी असतात व वातावरणात आणि आपल्या जीवनात त्यांचे महत्वाचे स्थान आहे.

Similar questions