आपत्ती व्यवस्थापन या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
37
आपत्ती म्हणजे आकस्मिक आलेले संकट होय. आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. भूकंप, पूर, दुष्काळ, ढगफुटी, चक्रवादळ हे सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत . तर दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, प्रदूषण या मानवनिर्मित आपत्ती आहेत. या दोन्हीही प्रकारात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते, म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्वांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. विविध कार्यशाळांचे आयोजन करणे, पथनाट्य, जाहिरात, पोस्टर या सर्व माध्यमातून प्रचार करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. गावपातळी- शहरपातळी, जिल्हास्तर सर्वांनी मिळून आलेल्या कुठल्याही संकटाला न घाबरता समोर जाऊन मदत करावी व आपत्ती मध्ये होणारे नुकसान टाळावे.
Answered by
0
Answer:
Explanation:निबंध
Similar questions