गट्टी जमणे
वाक्यप्रचाराचा अर्थ व वाक्यात उपयोग
Answers
Answered by
3
Answer:
गट्टी जमणे म्हणजे मैत्री होणे, स्नेह वाढणे किंवा निकटचे संबंध प्रस्थापित होणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची चांगलीच गट्टी जमली होती.
२. अजयला गट्टी जमवण्यात फारसा वेळ लागत नाही.
३. राम आणि श्याम यांचे वैचारिक मतभेद असले तरी त्यांची चांगली गट्टी जमली आहे.
४. राजनैतिक मंडळी आपापसात भांडत असले तरी आपापसात त्यांची चांगली गट्टी जमलेली असते.
५. मी या शाळेत नवीन असलो तरी माझी भरपूर मुलांशी लगेच गट्टी जमली.
वरील विधानांवरून असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्याशी सलोख्याचे संबंध निर्माण होणे म्हणजे गट्टी जमणे होय. दोन व्यक्तींमध्ये असणारे मैत्रीचे संबंध किंवा प्रेमाचे संबंध निर्माण होणे म्हणजे गट्टी जमणे होय.
Answered by
0
Answer:
सानिका आणि ऋतू ची चांगली गट्टी जमली होती
Similar questions