Hindi, asked by hmaniyar79, 4 months ago



गटात न बसणारा शब्द ओळखा . (आकाश , गगन , सदन , नभ )​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

सदन हा गटात न बसणारा शब्द  आहे.

Explanation:

गटात न बसणारा शब्द-

ज्यावेळी काही शब्दांचा समूह दिलेला असतो व दिलेल्या शब्दांपैकी एक शब्द हा वेगळ्या अर्थाचा असतो व उर्वरित सर्व शब्द एक कोणत्यातरी गोष्टींमुळे जोडलेले असतात किंवा समान अर्थाचे असतात. त्यामुळे जो शब्द हा इतर दिलेल्या शब्दांशी जुळत नाही किंवा त्याचे गुणधर्म वेगळे असतील तर त्या शब्दाला गटात न बसणारा शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

फुल, जल, पुष्प, सुमन

या चारही शब्दांपैकी फुल, पुष्प आणि सुमन या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, तर जल या शब्दाचा अर्थ वेगळा होतो म्हणूनच 'जल' हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे.

तसेच दिलेल्या शब्दांपैकी आकाश, गगन आणि नभ या शब्दांचा अर्थ एकच होतो तर 'सदन' या शब्दाचा अर्थ वेगळा असल्यामुळे तो गटात न बसणारा शब्द आहे.

Similar questions