Science, asked by PragyaTbia, 1 year ago

गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा: अभिस्तर, स्नायूतंतू, चेतातंतू, अपित्वचा

Answers

Answered by gadakhsanket
1

★उत्तर - अभिस्तर, स्नायूतंतू, चेतातंतू, अपित्वचा या। गटात न बसणारा शब्द अपित्वचा हा आहे. कारण उरलेल्या सर्व ऊती या प्राण्यांच्या ऊती आहेत.

अभिस्तर ऊती- प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरनांना ' अभिस्तर ऊती ' असे म्हणतात.

अभिस्तर युतीचे प्रकार

1) साल पट्टकी अभिस्तर - तोंड ,अन्ननलिका रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायूकोश यांची आतील बाजू या ठिकाणी असतात.

2)स्तरीत पट्टकी अभिस्तर- त्वचेच्या बाह्यस्तरात असतात.

3)ग्रंथिल अभिस्तर - त्वचेचे आतील स्तर

4)स्तंभिय अभिस्तर - आतड्याचा अन्नमार्गाचा आतील स्तर

5)रोमक अभिस्तर - श्वसनमार्गाची आतील बाजू

6)घनाभरूप अभिस्तर - वृक्कनलिका , लालग्रंथी.

स्नायूतंतु- आकुंचन व शिथिलीकरण ज्यांच्यामुळे होते

त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनांपासून स्नायूतंतू व स्नायूऊती बनतात.

धन्यवाद..

Similar questions