गतीविषयक स्तिथी वेग संबंधाचे समीकरण कोणते आहे
Answers
Explanation:
Contents show
जर एखादी वस्तू स्वतःची जागा वेळेनुसार बदलत असेल तर ती गतीमध्ये (Motion) आहे असे म्हणतात. पण जर एखादी वस्तू स्वतःची जागा वेळेनुसार बदलत नसेल तर ती स्थिर (Rest) आहे असे समजले जाते. गती व गतीचे प्रकार (Motion and laws of motion) पुढीलप्रमाणे –
गतीचे प्रकार (Types of Motion)
स्थानांतरणीय गती (Translational Motion)
जर एखादी वस्तू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे जाऊन आपली जागा बदलत असेल, तर त्याला स्थानांतरणीय गती असे म्हणतात. यामध्ये पहिल्या बिंदुपासून आणि शेवटच्या बिंदूकडे जाताना वापरलेला मार्ग पुन्हा गिरवला जात नाही.
घुर्णन गती (Rotational Motion)
जर एखादी वस्तू विशिष्ट आसाभोवती फिरत असेल तर ती घुर्णन गतीमध्ये आहे असे म्हणतात. यामध्ये वस्तू ठराविक वेळेनंनतर तोच तोच मार्ग गिरवते. आणि तो मार्ग वर्तुळाकार असतो.
उदा. भोवरा, पंखा इत्यादी.
दोलन गती (Oscillatory Motion)
जर वस्तू एकाच मार्गाने फिरत असेल पण मार्ग वर्तुळाकार नसेल तर त्या गतीस दोलन गती म्हणतात.
उदा. झोका, दोलक इत्यादी.
विस्थापन आणि अंतर (Displacement and Distance)
अंतर (Distance) – अंतर म्हणजे गतिमान वस्तुमधील आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील प्रत्यक्ष मार्गक्रमण होय.
विस्थापन(Displacement) – वस्तू स्थिर झाल्यानंतर आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन होय.
अंतर आणि विस्थापन मधील फरक
हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की, एक मुलगा पूर्वेकडे ३ किमी जातो आणि नंतर उजवीकडे वळून ४ किमी जातो. या एकूण प्रवासामध्ये मुलाने ७ किमी अंतर कापले, पण खरे पाहता त्या मुलाचे विस्थापन ५ किमी एवढेच झाले.
जास्तीत जास्त विस्थापन म्हणजे अंतर होय.
विस्थापन हे अंतरापेक्षा जास्त असू शकत नाही, परंतु अंतर हे विस्थापानापेक्षा जास्त असू शकते.
अंतर ही अदिश राशी (Scalar quantity) आहे, आणि विस्थापन ही सदिश राशी(Vector quantity) आहे.
चाल व वेग (Speed and velocity)
चाल (Speed)
एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. चाल ही अदिश राशी(Scalar quantity) आहे.
सूत्र : चाल = (एकूण कापलेले अंतर) / (एकूण लागलेला वेळ)