घड्याळ बोलू लागले तर निबंध मराठी
Answers
घड्याळ बोलू लागले तर
टिक- टिक
३ वाजले आहेत!
हो मी घड्याळ बोलतोय. तोच घड्याळ जो भिंतीवर लावलेला आहे. मी तुम्हाला वेळ दाखवतो. कधीही कोणाला उशीर होऊ दिला नाही. घरातून बाहेर पडताना नेहमी तुमचे माझाकडे लक्ष असतं.
मी नेहमी वेळेवर असतो आणि तुम्ही आपलं काम वेळेवर करा म्हणून तुम्हाला दार तासाला आवाज देत असतो. माझे 3 काटे तुह्मला एकत्र काम करायला शिकवतात.
जीवनात वेळेचे खूप महत्व आहे.
◆■घड्याळ बोलू लागले तर!■◆
एकदा मी माझ्या रूममध्ये आराम करत होतो. माझी नजर बाजूला ठेवलेल्या घड्याळावर गेली. तेव्हा, मनात विचार आला, जर हे घड्याळ बोलू लागले तर!
तर ते म्हणेल, "वेळ जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे आणि सगळी कामं वेळेवर झाल्यावर आपल्याला आपल्या कामात यश मिळते आणि वेळ दाखवण्याचे महत्वपूर्ण काम मी करतो.
मी तुझी खूप मदत करतो. माझ्या अलार्मच्या आवाजामुळे तू सकाळी लवकर उठतोस आणि दिवसाची सुरुवात करतोस. रोज तू मला तुझ्या मनगटावर घालतोस आणि कामाला जातो.
वेळ पाहण्यासाठी तू सतत माझ्याकडे पाहत असतो. मी तुला अचूक वेळ दाखवून तुला तुझ्या कामामध्ये उशीर होऊ देत नाही. माझ्यामुळे तू वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचतोस, वेळेवर तुझे काम करतोस.
माझी तुझ्याकडे फक्त एक तक्रार आहे. कधीकधी तू खूप आळशी बनतो, वेळेचा दुरुपयोग करतो व वेळेवर काम करत नाही. तेव्हा मला तुझ्यावर राग येतो. वेळेचा सदुपयोग करायला शिक. मी नेहमी तुझी मदत करत राहील."
अचानक आईचा आवाज ऐकू आला आणि मी माझ्या कल्पनेच्या दुनियेतून बाहेर पडलो.