Ghadyal Naste Tar Essay in Marathi | Nibandhघड्याळनसतेतरनिबंध
Answers
Explanation:
घड्याळ नसते तर.. कल्पनाच करवत नाही. खरंच घड्याळ नसेल तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेचे सर्वच गणित चुकेल. घड्याळ नाही तर उठायचे कधी, शाळेत जायचे-यायचे कधी हे काहीच समजणारच नाही. घड्याळ नसल्याने मारकुटे मास्तर तासाची वेळ संपून वर्गाबाहेर पडण्याचीही शक्यता नसणार, त्यामुळे त्यांचा मार जास्त वेळ सहन करावा लागणार. घड्याळच नाही तर प्रत्येक तासानंतर शिपाई घंटा कशी वाजवणार. घड्याळ नसेल तर सर्व लोकांमध्ये शिस्त आणि नियमावली राहणार नाही. त्यामुळे सगळीकडेच अंदाधुंदी माजेल. एस.टी., रेल्वे, विमान यांना परिपत्रक नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. अशाने आळशी लोकांना आनंद होईल पण कष्ट करणाऱ्यांना अशा गोष्टींचा त्रास होईल.
घड्याळे बनण्याच्या अगोदरही आयुष्य व्यवस्थित चालायचे. पृथ्वी वरती माणसाची वसाहत हजारो वर्षांपासून आहे, आणि तेव्हा घड्याळ नव्हते. पुरातन काळात लोक सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र यांच्या सहाय्याने वेळ मोजत असत. खूप लोकांना हे माहीत नाही की, वेदिक काळातही खूप अवगत वेळ मोजण्याची प्रणाली होती, अगदी परमाणु (१७ मैक्रोसेकंड्स) ते महा-मन्वंतर (३११.०४ ट्रिलियन वर्षे). तेव्हा २४ तास म्हणजे दिवसाला अहोतरम मध्ये मोजत, तर आजचे १.६ मिनिट्स म्हणजे “एक लघु” असे. त्याच प्रमाणे एक मास म्हणजे १ महिना, अयान म्हणजे ६ महिने, आणि समवत्सर म्हणजे वर्ष.
अशा बेधुंद जगात राहण्यापेक्षा वेळेचे भान दाखविणारे दोन काट्यांचे हे घड्याळ माणसाला माणुसकीने जगायला शिकवते. पशूपेक्षा मानवजीवन वेगळे आहे याची जाणीव करून देते. घड्याळ वेळ पाहून, वेळेचे भान ठेवून वक्तशीरपणाने काम करायला शिकवते. म्हणूनच आपल्यासाठी घड्याळ खूप महत्वाचे आहे.
आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व दिले जाते. गेलेला वेळ परत कधीच येत नाही म्हणूनच आपण त्याचा आदर करतो व पालन करणे साहजिक आहे. घड्याळ आपल्याला प्रत्येक वेळ दाखवते, आणि जर हेच घड्याळ आपल्या कडे नसेल तर? बापरे ही कल्पना खूपच भयानक आहे.
घड्याळ नसेल तर आपण दिवसाची सर्वात गजराने करतो, ते शक्य होणार नाही, लोक झोपून राहतील व कामाला जायला उशीर होईल. लहान मुलांना शाळेत जाता येणार नाही कारण त्यांची दिवसाची सुरुवात होणार नाही. दिवस, रात्र पटकन निघून जातील आणि वेळेचे कोणालाच भान नाही राहणार. एक किस्सा मी येथे सांगतो, एके दिवशी मी घड्याळात गजर लावून झोपलो कारण पुडच्या दिवशी माझा खूप महत्त्वाची परीक्षा होती. सकाळी गजर वाजलाच नाही आणि मला पेपर ला जायला उशीर झाला कारण घड्यालातले बॅटरी संपली होती. आता विचार करा जर घड्याळ नसेल तर किती कठीण परिस्थिती होईल. लोक आपल्या हातात घड्याळ घालून फिरतात, जर ते नसेल तर त्यांना किती वाजले ? घरी कधी निघायचे ? ट्रेन कुटची पकडायची ? ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागेल. घड्याळ नसेल तर परीक्षेत सुद्धा आपण वेळेवर लक्ष नाही देवू शकणार व आपला पेपर सुटण्याची भीती वाटेल. म्हणूनच घड्याळ आपल्या साठी खूप महत्त्वाचे आहे.