India Languages, asked by patilarun969, 9 months ago

_ *"घर-"*_


"हे काय पप्पा, तुम्ही सगळं घर घाण करून टाकले. आत्ताच राधा ने फरशी पुसली होती आणि तुम्ही चपलांचे ठसे उमटवले. थोडं तरी समजायला पाहिजे तुम्हाला? तुम्ही काही लहान नाही."
सुनबाई रिया च्या तोंडून हे ऐकून अनिलजींना धक्का बसला. पोलीस च्या नोकरीत त्यांच्या एका आवाजाने अपराधी थरथर कापत असत आणि आज त्यांची सून त्यांच्याच घरात त्यांना इतके ऐकवत होती.
तेवढ्यात पत्नी ने त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाली "काही हरकत नाही, सुनेचे बोलणे काय मनावर घ्यायचे? फक्त तोंडाने फटकळ आहे, तसं तिच्या मनात काही नसतं."
अनिलजींनी पत्नी रमा कडे बघितले, जसे की विचारत होते की "खरंच?" आणि त्यांच्या ओठांवर हसु तरळले, पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
सोफ्यावर बसून ते विचार करत होते की किती प्रेमाने हे घर बांधले होते, एक एक वीट आपल्या मनाप्रमाणेने रचली होती या घराची, जेणेकरून निवृत्ती नंतर पति पत्नी सर्व सोयी सुविधांनी युक्त घरात आरामात राहू. परंतु आज सर्व जग त्यांच्या खोलीपर्यंत मर्यादित झाले होते. खोली तून बाहर निघावे तर किती ऐकावे लागते त्यांना.
हॉल मध्ये शेकोटी पेटवण्यासाठी आवडीने भिंतीत चिमणी (फायर प्लेस) बसवली होती की थंडीच्या दिवसात तेथे शेकोटी पेटवून शेकत रमासह भाजलेल्या शेंगा खाऊ, पण काय हिम्मत की सुनबाई थंडीत शेकोटी पेटवू देईल, म्हणायची की 'सर्व घरात राखचे कण पसरतील', मग ती चिमनी तशीच रंगवलेली दिसायची, एकदम नव्यासारखी, कारण सुनेला ती तशीच आवडायची.
हा सर्व विचार करतच होते की हातात काॅफी चा मग घेऊन रमा त्यांच्याजवळ येऊन बसल्या. त्या आपल्या पतीला चांगले ओळखून होत्या. त्यांना चांगले माहित होते की ते आता रागात होते, आणि त्यांच्या हातची काॅफी पिऊन त्यांचा राग शांत होऊन जाईल.
रमापण काय करेल, पति आणि मुलगा सोमेश च्या प्रेमात अडकलेली एक भारतीय स्त्रीच होती. दोन्ही बाजू सांभाळत दिवस काढत होती, कधी मुलांचे ऐकायच्या, कधी पतीचं.
एक दिवस सकाळी फिरुन आल्यावर पति पत्नी दोघे लॉन वर बसले होते. नोकर चहा ठेवून गेला, दोन ऐवजी चहाचे तीन कप बघून त्यांना थोडं वेगळं वाटलं. कारण त्यांच्याशिवाय फक्त सोमेश चहा पित असे आणि तो त्यांच्या सोबत कधी चहा पीत नसे. त्याने त्यांच्यासोबत बसणं कधीच सोडलं होतं, मग आज?
तेवढ्यात सोमेश तेथे येऊन बसला, सोबत चहा पिऊ लागला. पण एक अजब शांतता पसरली होती.
हा तोच सोमेश आहे ज्याचे लहानपणी बोलणंच संपत नव्हतं. अनिलजी कितीही थकलेले असो, सोमेश सोबत खेळत असायचे. तो बोलून बोलून थकून झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या गप्पाच संपत नसत. आज अजब औपचारिकता बाप-मुलामध्ये बनून राहिली होती.
तेव्हा रमा शांती भंग करीत म्हणाल्या, "सोमेश, पुढच्या महिन्यातच रियाच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे ना?"
"हो आई, त्याविषयीच बोलायला आलो आहे. मुलाकडचे याच शहरातील आहेत व त्यांना लग्न याच शहरात करायचं आहे. म्हणून रियाच्या परिवाराला लग्नासाठी हे घर हवं आहे. आपले घर लग्नघर म्हणून पाहिजे आहे. म्हणून मला वाटतं, जोपर्यंत घरात गर्दी राहिल तोपर्यंत तुम्ही दोघं दीदी कडे जाऊन रहावं. तुम्हा दोघांना ही गर्दीमुळे त्रास होईल आणि दिदी पण याच शहरात आहे म्हणून तुम्हाला काही त्रासही होणार नाही. तुमची दोघांची खोलीही त्यांना कामात येईल.
हे ऐकून अनिलजी रागाने लाल झाले. तरीही आपला आवाज नाॅर्मल ठेवत म्हणाले, "तिच्या घरच्यांना भाड्याने दुसरे घर घेऊन दे दहा पंधरा दिवसांसाठी. आम्ही कशाला दुसऱ्या ठिकाणी जाऊ?"
"पप्पा, तुम्ही पण ना गजब करता, रियाच्या घरचे लोक आहेत. आपलं इतकं मोठं घर असून त्यांच्यासाठी दुसरे घर बघायचे ! रिया ने तर त्यांना सांगूनही दिले आहे. आता तुम्ही तुमचे पाहून घ्या, ते येथेच येतील." असे बोलून सोमेश उठून आत निघून गेला.
आतून सून रिया चा ही आवाज येऊ लागला. बहुतेक तिने सर्व ऐकले होते आणि तिला अनिलजींचं बोलणं आवडलं नसावं.
आज रमा डोळ्यांतून अश्रू ढाळत होत्या. अनिलजींनी आपला खांदा पुढे केला, जसे म्हणत होते की "अजून मी आहे, सर्व ठीक करून देईन."
दूसऱ्या दिवशी सायंकाळी अनिलजी फिरून आले तेव्हा रमाने सांगितले की, सोमेश, रीया आणि मुलांसह सुट्टी आहे म्हणून सासरी गेला आहे.
अनिल जी हसले व म्हणाले, "बघ वेडी, हीच मुलं आहेत ज्यांच्यासाठी तू माझ्याशी भांडत होतीस, ज्यांच्यासाठी कित्येक रात्री आपण जागून काढल्या होत्या, आज ते आपल्यालाच आपल्या घरातून जायला सांगत आहेत. काही हरकत नाही, मी पण त्याचा बाप आहे." म्हणून आत निघून गेले.
एक आठवड्यानंतर सोमेश कुटुंबासह परत आला तर दरवाजाला कुलुप लावलेले होते. चौकीदार त्यांना बघून जवळ आला व एक चावी व चिठ्ठी सोमेशच्या हातात दिली. चिठ्ठी उघडून वाचू लागला, ती चिठ्ठी अनिलजींनी सोमेश च्या नावे लिहिली होती,
'सोमेश,
मी आणि तुझी आई रामेश्वरम ला जात आहे. एक महिन्यांनी परत येऊ. ही तुझ्या हातातली चावी या घराची नाही. ती दुसऱ्या फ्लॅट ची आहे ज्यात तुम्हा सर्वांचे सामान ठेवलं आहे.
तो फ्लॅट मी खुप पुर्वी विकत घेतला होता, तुला सांगीतले नव्हते. अगदी माॅडर्न भागात आहे. तुमच्यासाठी चांगला आहे. आवडला नाही तर आपल्या सोयीने दुसरा घेऊन घ्या. हे घर माझं आणि तुझ्या आईचं आहे आणि आमचंच राहिल. यातून आम्हाला कुणीच काढू शकणार नाही.

हे आमचे स्वप्नातील घर आहे ज्यात आम्हाला मुलं, नातवंडांसह रहायची इच्छा होती, पण देवाला हे मंजूर नव्हते आणि तुम्हाला आमचा सहवास आवडत नव्हता. ते घर मी आणि आईकडून आशिर्वाद म्हणून दिलं आहे. इच्छा असेल तर ठेवा नाही तर परत करा, आई-वडिल या नात्याने आम्ही आपला आत्मसम्मान सोडू नाही शकत.

वाचून होताच सोमेशला धक्का बसला. डोळ्यात अश्रू होते, परंतु हे माहीत नाही की ते पश्चातापाचे होते की इतकं मोठं घर सोडावे लागेल म्हणून, की वडिलांची संपत्ती मुलांचीच असते हा विश्र्वास तुटल्यामुळे होते ते माहीत नाही.
*सदैव प्रसन्न रहा!!*
*जे प्राप्त आहे- ते पर्याप्त आहे!!*
सुनिल कोबाळकर





this essay translate into English ​

Answers

Answered by lucifer480
1

Answer:

_ *"House-"*_

"Hey Kya Pappa, you are the home of the house, Karun Takle. Attach Radha is a pusli, and you are flattering.

Sunbai Riya Chya Tondu

Answered by Anonymous
2

 \huge \mathfrak \red{AnswEr}

_______________________

" what's the matter, dad ? You have all made dirty . Right now Radha had wiped floor and made footprint.

Do you need to understand at least a little bit

you are a little short ."

:No

:Anil was stunned to here Sunbai Riya's taundun hai criminals tremble at one of there voice in police jobe kaft was and today his daughter-in-law in his own house listening to much.

At that moment, his wife sat him on the sofa and sait ," No problem, what do you want to talk about? just by mouth fatkal is , she has nothing in her mind .

Anilaji looked as his wife Rama, as if asking, " Really?" and smile a melted on their lips , but the eyes , the edges are wet.

Sitting on sofa, he was thinking how loving this house is were built . one by one the woman was Ravi according to her mind this house , so that all comferts of husbend and wife after retirement, we will stay in comfertable house with facilities.

But today all the world their confined to the room, if you have to leave the room how much they have to listen.

chimeny on the wall with love to light a fire in the hall ( fier place ) they were fiers on a cold day lets eat rosted beans with firewood, but what dare that Sunbai would light the fire in the cold to say ,' ashes spred in the house , then the Chimney was painted the same way it looks like a sack that encloses with the drawing

To like

it was all about thinking with cup of coffee in hands Rama comes and sit beside them . that's good for your husband were recognisable.

new in the look he was angry were, and

calmed their anger by drinking a cup of coffee .

I will give you all ans at night don't report plz wait it is too long I have to translate all and the upload

Similar questions