२) घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल?
उत्तर:-
Answers
Answered by
1
Answer:
अतिथी देवो भव ।’ असे म्हटले आहे. याचा अर्थ अतिथी हे देवाचेच रूप आहे. ‘अतिथीच्या रूपाने देवच आपल्याकडे आलेला असतो’, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे. धर्माच्या शिकवणीनुसार पाहुण्यांचा आदर आपण केला पाहिजे. त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य चांगल्या पद्धतीने केले पाहिजे.
घरी पाहुणे किंवा अतिथी आल्यावर त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य कसे करावे?
१. घरी आलेल्या पाहुण्यांना लगेच उठून नमस्कार करून स्वागत करावे.
२. पाहुणे उभे असतांना त्यांच्यासमोर बसू नये.
३. त्यांना बसायला जागा करून द्यावी.
४. पाहुणे बसल्यावरच आपण बसावे, तोपर्यंत उभे राहावे. यातून आपली नम्रता वाढते आणि त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त होतो.
५. पाहुणे बाहेरून दमून आलेले असतात, त्यामुळे त्यांना लगेच पाणी द्यावे.
६. त्यांच्याशी हसतमुखाने आणि प्रेमाने वागावे.
७. आई-बाबांनी त्यांच्यासाठी चहा, कॉफी किंवा सरबत बनवायला सांगितले, तर ते लगेच बनवावे.
८. आई-बाबा पाहुण्यांशी बोलत असतांना आपण मधेच वेगळ्या विषयावर बोलून त्यांच्या चाललेल्या विषयात व्यत्यय आणू नये.
Similar questions