घरावरुन मिरवणूक गेली' या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. अ) अभिधा ब) लक्षणा
क) व्यंजना
Answers
Answer:लक्षणा
Explanation
याचात आपण शब्दाचा मुळ अर्थ न घेत मा त्याचा दुसरा अर्थ घेतो.
Answer:
घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्ती लक्षणा आहे.
Explanation:
शब्दशक्ती:
शब्दशक्ती म्हणजे अशी प्रक्रिया तिच्यातून शब्दाचे वेगवेगळे अर्थ निर्माण होतात. शब्दांमधे असलेल्या वेगवेगळे अर्थ निर्माण करण्याच्या शक्तीलाच शब्दशक्ती असे म्हणतात.
शब्दशक्ती चे एकूण तीन प्रकार असतात.
१. अभिधा- वाक्यात आलेल्या शब्दाचा जो सहज अर्थ घेतला जातो त्याला अभिधा असे म्हणतात.
उदाहरणार्थ- राम शाळेत जातो.
२. लक्षणा- वाक्यात आलेल्या शब्दाचा जशास तसा अर्थ न घेता त्याच्याशी समरस असा वेगळा अर्थ घेतला जातो त्याला लक्षणा असे म्हणतात. उदाहरणार्थ- आम्ही गहू खातो.
३. व्यंजन- दिलेल्या वाक्यातील एखाद्या शब्दाचा किंवा शब्द समूहाचा एक वेगळाच अर्थ घेतला जातो त्याला व्यंजन असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
समाजात जे गरजतात ते बरसत नाहीत.