१) घटत्या सीमान्त उपयोगितेचा सिद्धान्त अपवादासह स्पष्ट
करा.
Answers
Answer:
हा सिद्धांत सर्वप्रथम गॉसेन या अर्थतज्ञांनी मांडलेला आहे . त्यानंतर हा सिद्धांत विकसित करण्याचे काम डॉ. मार्शल यांनी केल्यामुळे हा सिद्धांत त्यांच्या नावाने ओळखला जातो .
सिध्दांताचे विधान / व्याख्या :-
" इतर परिस्थिती कायम असतांना व्यक्ती जवळ असलेल्या वस्तूच्या साठा जसजसी वाढ होत जाते , तसतसे त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीपासून मिळणारे समाधान घटत जाते."
सिध्दांताची गृहिते :-
1. इतर परिस्थिती कायम असावी .
2. वस्तुचे सर्व नग एकजिनसी असावे .
3. वस्तुचे नग सातत्याने उपभोगले पाहिजेत .
4. उपभोगता विवेकशील व ज्ञानी असला पाहिजे.
5. उपभोगत्याचे उत्पन्न स्थिर आहे .
6. इतर वस्तुच्या किंमती स्थिर आहेत .
7. उपभोगता मानसिक दृष्ट्या सर्वसाधारण आहे .
सिध्दांताचे स्पष्टीकरण :-
या सिध्दांताचे स्पष्टीकरण करण्यासाठी डॉ. मार्शल यांनी आर्थिक विश्लेषणातील अनुसूची आणि आलेख या दोन साधनांचा वापर करून सिद्धांत स्पष्ट केलेला आहे.