give me a essay on mobile che tote in marathi
Answers
Answered by
2
आजच्या धावपळीच्या, व अचानक उद्भवणाऱ्या वारंवार घटना पाहता मोबाइल नक्कीच वरदानच आहे. परंतु मोटार सायकल, चारचाकी व इतर गाड्या चालविणाऱ्यांनी मोबाइलवर बोलताना वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून बोलणे आवश्यक आहे. हे नियम न पाळल्यास मोबाइल शापच आहे. मोबाइल वापरताना सतत रेडिओ, गाणी ऐकणे, सतत बोलत राहणे, हे टाळावे. बस, रेल्वेमध्ये मोठ्याने गाणी लावण्यामुळे आपणच प्रदूषण निर्माण करतो. तरी या गोष्टी टाळाव्यात. आवश्यक तेवढेच बोलणे, बोलताना नॉर्मल आवाजात बोलणे, शक्यतो ज्या रस्त्यावर वाहनांची फार मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते अशा रस्त्यावर न बोलणे, रस्ता क्रॉस करताना न बोलणे, मोबाइलवर स्पीकर फोनची सुविधा असल्यास ऑन करून बोलणे या सर्वाची काळजी घेणे आवश्यक आहे. मोबाइलचा योग्य वापर न केल्यामुळे रेल्वेमधून प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, मोटार सायकल चालू असताना बोलल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. सुशिक्षित जनतेने मोबाइलचा वापर योग्य तऱ्हेने करावा
Similar questions
Biology,
7 months ago
Math,
7 months ago
Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago