Physics, asked by Paramjeet71981, 11 months ago

Greedy dog srory in marathi

Answers

Answered by Typhoone
4

Answer:

एका गावात एका गरीब शेतकऱ्याकडे सांभा नावाचा कुत्रा होता. तो शेतकऱ्याचं घर आणि शेत राखत असे. त्या मोबदल्यात त्याला भाकरी मिळायची. रोज भाकरी खाऊन सांभाला आला कंटाळा. त्याला चमचमीत अन्न खाण्याची इच्छा होऊ लागली. पण शेतकऱ्याकडे ते मिळणं, शक्य नव्हतं. म्हणून सांभाने तेथून पळ काढली. पळता पळता सांभा मोठ्या उद्यानात येऊन पोहोचला. एका झाडाखाली जाऊन बसला. तेवढ्यात त्या झाडावरून बूंदीचा लाडू त्याच्या समोर पडला. त्याने झाडावर पाहिलं तर एक माकड हातात दोन-चार लाडू घेऊन बसला होता. माकडाने अजून एक लाडू सांभाकडे फेकला. सांभा खुश झाला. त्याने ते लाडू पटकन फस्त केले. माकडाने सांभाला विचारलं, तुला असं रोज खायला आवडेल का? मग मला मदत कर. आपण एक प्लॅन करू. सांभाने लगेच होकारार्थी उत्तर दिले.

दुसऱ्या दिवशी माकड व सांभा मंदिराच्या पायथ्याशी लपून बसले. काही बायका ताटात फळं व मिठाई घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढू लागल्या. तेवढ्यात सांभा भुंकत त्यांच्या अंगावर धावला. घाबरून बायकांच्या हातून ताटं खाली पडली. माकडाने त्यातली फळं आणि मिठाई उचलली आणि त्या दोघांनी तेथून पोबारा केला. बरेच दिवस माकड व सांभा गावात असा धुडगूस घालत होते. सारे गावकरी या त्रासाला कंटाळले होते. एक दिवस हे दोघं शाळेच्या फाटकाशी लपून बसले. मधली सुट्टी होताच मुलं बाहेर आली. त्यांनी डबे उघडले. सांभा त्यांच्यावर भुंकू लागला. मुली घाबरून आरडाओरड करू लागल्या. ते ऐकून शाळेचा शिपाई लगेच काठी घेऊन तिथे आला. त्याला बघताच माकडाने धूम ठोकली पण सांभा मात्र त्याच्या तावडीत सापडला. शिपायाने सांभाला काठीने बेदम मारले आणि शाळेचा आवारात साखळीने बांधून ठेवले. सांभाला आपली चूक कळली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

तात्पर्य: मेहनतीने मिळवलेली कोरडी भाकर बरी पण चोरीने मिळवलेले लाडू नकोत. कारण चोरी करून मिळवलेल्या वस्तू आनंद नव्हे तर शिक्षा देतात.

________________❤

⭐♦️⭐hope it helps uh ⭐♦️⭐

⭐♦️⭐follow me and mark as brainliest. ⭐♦️⭐

Similar questions