guys please help me
no spam
![](https://hi-static.z-dn.net/files/d82/53089b0e5953128f4c6927d4e1c046a8.jpg)
Answers
★ प्रसंग लेखन :
उत्तर :
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा केला. जानेवारी महिन्यातील दिनांक 26 ला प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाची तयारी कमीत कमी एक महिना आधीपासूनच केली होती. मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मला यामध्ये अतिशय विशेष लक्ष द्यावे लागले.
26 जानेवारी दिवशी जिथे झेंडावंदन करावयाचे आहे ती जागा दोन दिवसांपासून सजवून ठेवली होती. तोरणे-पताका लावून सजवल यामुळे ती जागा आकर्षक दिसत होती. सकाळी लवकरच सर्व विद्यार्थी आपापल्या गणवेशात कॉलेजच्या प्रांगणात उपस्थित झाले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री पाटील यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. सर्व उपस्थित शिक्षक, प्राचार्य, प्रमुख अतिथी आणि विद्यार्थी सर्वांनी एक साथ राष्ट्रगीत म्हटले.
एन. सी. सी. व स्काउटच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रीतीने संचलन केले.
उत्सुक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, झेंडा गीत सर्वांसमोर सादर केले.
प्राचार्यांचे आणि प्रमुख अतिथींचे भाषणे आटोपल्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेल्या स्पर्धांचे बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
अतिशय उत्साहात साजरा करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा शेवट प्राध्यापक श्री मोहिते यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
Explanation:
Hlo shruti
kaise h tu
yrr bhut din ho gye bat nhi krti abb mere se