हा हत्थी अगडबंब आहे (उद्गरार्थी वाक्य)
Answers
Answer:
अबब! किती अगडबंब आहे हा हात्ती!
अबब! किती अगडबंब आहे हा हत्ती.
दिलेले वाक्य हे विधानार्थी वाक्य असून दिलेल्या प्रश्नानुसार आपल्याला त्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात करायचे आहे.
- दिलेले वाक्य उद्गारार्थी करत असताना आपल्याला अशा शब्दाचा वापर करावा लागेल ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपली उत्कट भावना अचानकपणे बाहेर आलेली दाखवता येईल.म्हणून दिलेल्या वाक्य उद्गारार्थी करत असताना त्याच्या सुरुवातीलाच आपल्याला अबब या शब्दाचा वापर करून त्यानंतर उद्गारार्थी चिन्हाचा वापर करावा लागेल.
- त्यानंतर वाक्याचे स्वरूप बदलवावे लागेल आणि किती अगडबंब आहे हा हत्ती असे करावे लागेल.
- उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करत असताना अचानक आलेल्या भावना आपल्याला दाखवाव्या लागतील व त्यानंतर विशेषण वापरून सर्वात शेवटी नाम लिहावे लागेल व उद्गारार्थी चिन्हाचा वापर करावा लागेल.
उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय?
उद्गारार्थी वाक्य हे असे वाक्य असते ज्यातून माणसाच्या एखादी गोष्ट बघितल्यावर अचानक आलेल्या भावना स्पष्ट केल्या जातात. उस्फूर्तपणे ज्यावेळेस भावना अचानकपणे बाहेर पडतात अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
- किती सुंदर फुल आहे हे!
- किती सुंदर इमारत आहे ही!
- बापरे! त्याला साप चावला.
- बापरे! किती भला मोठा पहाड.
वरील दिलेल्या प्रत्येक वाक्यामध्ये उत्स्फूर्तपणे भावना व्यक्त केलेल्या आहेत म्हणून वरील वाक्य हे उद्गारार्थी वाक्याचे उदाहरणे आहेत.
उद्गारार्थी वाक्यांच्या बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.-
https://brainly.in/question/37063451
वाक्यांच्या प्रकाराबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/23947826
https://brainly.in/question/15738167
#SPJ3