हॉकी या खेळावर निबंध लिहा
Answers
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी हा खेळ जगभरात प्रसिद्ध आहे. लाकडी स्टिक व बॉलच्या साह्याने हा खेळ खेळला जातो. यात 11 खेळाडू असतात व दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. हॉकी या खेळाला ऑलम्पिक खेळांमध्ये सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. हॉकिचा पहिला क्लब कलकत्ता येथे १८८५ मध्ये बनला. क्रिकेटप्रमाणेच हॉकी मध्येही काही भारताचे खेळाडू विश्वविक्रम करण्यात अग्रेसर होते, जसे की ध्यानचंद, अजितपालसिंग, धनराज पिल्ले इत्यादी. विभिन्न प्रकारची हॉकी भारतात व इतर देशात खेळल्या जाते. जसे की आईस हॉकी, फील्ड हॉकी, रोलर हॉकी . भारतात फील्ड हॉकीलाच राष्ट्रीय खेळ मानला जातो.
■■ "हॉकी" वर निबंध ■■
हॉकी हा विश्वभरात खेळला जाणारा एक प्रसिद्ध खेळ आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
हॉकी हा खेळ मैदानात खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी एक हॉकी स्टिक आणि बॉलची गरज असते. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघामध्ये, ११ खेळाडू असतात.
या खेळामध्ये एका संघाचे खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूंना "गोल" करण्यापासून थांबवतात, तसेच आपल्या खेळाडूंमध्ये हॉकी स्टिकच्या मदतीने बॉल पोचवून गोल करण्याचा प्रयत्न करतात. खेळाच्या शेवटी ज्या संघाचे सगळ्यात जास्त "गोल" असतात, तो संघ विजयी होतो.
वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हॉकी खेळली जाते. आइस हॉकी, रोलर हॉकी, फील्ड हॉकी,अंडरवाटर हॉकी, यूनीसायकल हॉकी, इत्यादि हॉकिचे विविध प्रकार आहेत.