हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात कारण?
Answers
Answer: जगाच्या नकाशाचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेले वेगवेगळे भूखंड हे आधी एकाच विशाल भूखंडाचा भाग असावेत. कालांतराने या भूखंडाचे तुकडे तुकडे होऊन ते इतरत्र वाहत जाऊन सध्याचे भूखंड अस्तित्वात आले असावेत. हा असा सिद्धांत सर्वप्रथम आल्फ्रेड वेगनर या जर्मन भूगोलतज्ज्ञाने मांडला.
वेगनरच्या सिद्धांतानुसार हे भूखंड एकमेकांवर आदळून पृथ्वीवर पर्वतासारखी भुरूपे निर्माण झाली असावीत. हिमालयाची निर्मितीदेखील याच त-हेने झाली असावी. कोणत्याही भूखंडाच्या अंतर्गत हालचाली या कायम सुरुच असतात. फक्त या हालचालींची तीव्रता कमी जास्त होत असते. हिमालय ज्या भूखंडांंच्या आपटण्यातून तयार झाला आहे त्यांनाही हा नियम लागू पडतो. या हालचालींमुळे भूकंपाची निर्मिती होते. म्हणून हिमालय भूकंपाच्या बाबतीत संवेदनशील आहे.
Explanation: