India Languages, asked by Henry12345678, 9 months ago

.हिरवंगार झाडासारखं .(रसग्रहण ) 10 std poem13 Marathi appreciation in point vise​

Answers

Answered by rajraaz85
54

Answer:

हिरवंगार झाडासारखं कवितेचे रसग्रहण

कवितेचे नाव: हिरवंगार झाडासारखं

कवी: जॉर्ज लोपीस

कवितेचा विषय: प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो आनंद जर मिळवायचा असेल, तर झाडांकडे असणारे सर्व गुण आपण स्वीकारले पाहिजेत किंवा अंगीकारले पाहिजे. हा महत्त्वाचा संदेश कवीने आपल्या कवितेतून दिला आहे.

खालील ओळींचा अर्थ:

झाडांचे बाहू सरसावले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी

पानझडी नंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतो नव्या नवरीसारख

वरील ओळींच्या माध्यमातून हा कवी झाडाचे अगदी विशेष असे गुण आपल्या दाखवतात. कवी म्हणतो झाड हे नेहमी मुसाफिर यांना मदत करण्यासाठी तयार असते रस्त्यात येणार्‍या प्रत्येक वाटसरूला सावली देण्याचे काम झाडे करत असते. जरी त्याच्या आयुष्यात पानझडी चा काळ येत असला म्हणजे त्याच्या आयुष्यात समस्या असल्या तरी, त्याला न घाबरता तो पुन्हा हिरवागार होतो आणि नवीन नवरीसारखा सजतो. म्हणजे आपणही समस्येला न घाबरता त्याच्यातून मार्ग काढले पाहिजे.

कविता आवडण्याचे कारणे:

हिरवंगार झाडासारखं ही कविता आपल्याला अनेक संदेश देते. झाड जसे नेहमी इतरांचा विचार करते, इतरांना मदत करते, कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाचा विचार न करता नेहमी देत राहण्याची भूमिका पार पाडते. असेच मनुष्याने देखील आपल्या आयुष्यात परोपकाराचे गुण अवलंबले पाहिजेत.

कवितेतून मिळणारा संदेश: माणसाने नेहमी सक्षम राहिले पाहिजे, कुठल्या संकटाला न घाबरता त्याचा सामना केला पाहिजे, आयुष्यात नेहमी दुसऱ्यासाठी जगले पाहिजे आणि एकमेकांना मदत केली पाहिजे असे अनेक संदेश या कवितेतून कवी देतो.

Answered by sakshamwaghmare04200
11

Explanation:

प्रस्तुत कवितेचे कवी - जॉर्ज लोपीस,

(२) प्रस्तुत कवितेचा विषय - माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे, हे सूत्र या कवितेतून मांडले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

'झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर

अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब.'

→ माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे असे सांगताना कवी म्हणतात, पहाटे पहाटे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरलेले दवाचे थेंब कवीला जाणवतात व त्याला कविता सुचते हा भावार्थ सूचित होतो.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - कवी जॉर्ज लोपीस यांची मुक्तछंदात लिहिलेली ही कविता आहे. झाडाचे महत्त्व, झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द .ही शिकवण या कवितेतून मिळते.

५)कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → 'झाड' हा निसर्गाचा एक घटक आहे. झाडाची परोपकारी वृत्ती, अविचल वृत्ती, दानशूरता, आनंदी वृत्ती हे गुण मानवाने आत्मसात करावेत. असे सांगितले आहे म्हणून ही कविता आवडते.

Similar questions