habit essay in Marathi
Answers
Answer:
प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या तरी सवयी असतातच.कोणाला वाईट तर कोणाला चांगल्या.
रोज सकाळी लवकर उठणे,व्यायाम करणे, स्वतःचे काम स्वतः करणे, आजूबाजूचे पर्यावरण साफ ठेवणे,निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे,पौष्टिक आहाराचे सेवन करणे,इतरांची मदत करणे, मेहनत करणे,आपले काम वेळेवर करणे,नेहमी खरे बोलणे, वेळेचे योग्य नियोजन करणे,मोठ्यांचा सन्मान करणे या काही चांगल्या सवयी आहेत.यांचे पालन केल्यावर माणसाला त्याच्या कामात यश मिळतो. तो इतरांसाठी एक चांगले उदाहरण प्रस्थापित करू शकतो.त्याला समाजात आदर मिळतो.
आपल्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे,मद्यपान किंवा धूम्रपान करणे, स्वच्छता न राखणे,टीव्ही आणि मोबाइलमध्ये जास्त वेळ घालवणे,एखाद्या गोष्टीचा अतिविचार करून निराश होणे,वाईट संगत ठेवणे,नकारात्मक विचार करणे, वेळ वाया घालवणे या काही वाईट सवयी आहेत.वाईट सवयी असलेल्या माणसाची अधोगती होते व त्याला समाजात आदर मिळत नाही.
म्हणून माणसाने नेहमी चांगल्या सवायी पाळल्या पाहिजेत.
Explanation: