History, asked by santoshpatade84, 4 months ago

हड़प्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत​

Answers

Answered by payalgpawar15
8

Answer :

हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलूचिस्तान यथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुश्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलली आहेत. लोथल यथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे.

Similar questions