Science, asked by shivajipadavale25, 5 months ago

हवेची बाष्प धरुन ठेवण्याची क्षमता हवेच्या .....प्रमाणे ठरते इयत्ता ९वी​

Answers

Answered by Itzpurplecandy
3

Answer:

आर्द्रता म्हणजे ओलावा. हवेमध्ये नेहमीच अल्पप्रमाणात बाष्प स्वरूपात पाण्याचा अंश असतो. ज्या हवेमध्ये जाणवण्याजोगे बाष्प असते तिला आर्द्र हवा म्हणतात. आर्द्रतेचे प्रमाण वाढले म्हणजे हवा दमट झाली असे आपण म्हणतो. दमट, उष्ण हवामानाच्या प्रदेशांत हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असते परंतु अशा परिस्थितीतही बाष्प साधारणतः हवेच्या एकूण घनफळाच्या मानाने शेकडा ४ हून अधिक नसते. थंड हवेच्या प्रदेशात व वालुकामय प्रदेशात, वातावरणामध्ये बाष्प अत्यल्प प्रमाणात असते.

हवा आर्द्र कशी बनते : हवेतील बाष्पाचे प्रमाण सारखे बदलत असते.एकीकडे समुद्र, नद्या, सरोवरे, हिम यांच्या पृष्ठापासून व वनस्पती, प्राणी, जमीन यांच्यापासून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे ते वाढत असते तर दुसरीकडे धुके, पर्जन्य, गारा, हिम यांच्या स्वरूपात संद्रवमाने (द्रव वा घनरूपात बदलल्याने) ते कमी होत असते. हवेचे तपमान, वातावरणातील बाष्पसंचय व काही प्रमाणात वातावरणीय दाब यांवर बाष्पीभवनाचे प्रमाण अवलंबून असते. त्याचप्रमाणे ज्या पृष्ठावरून बाष्पीभवन होते त्या पृष्ठाच्या स्वरूपावरही ते अवलंबून असते. वनस्पतींनी आच्छादिलेल्या पृष्ठापासून होणारे बाष्पीभवन केवळ पाण्याच्या पृष्ठापासून होणाऱ्या बाष्पीभवनापेक्षा अधिक त्वरेने होते. उच्च तपमान, उच्च पवनवेग, कमी आर्द्रता व कमी हवेचा दाब या गोष्टी बाष्पीभवनाचे प्रमाण वाढविण्यास उपयुक्त ठरतात.

Explanation:

hii

hope this helps you ✌️✌️

have a nice day ✌️✌️

Answered by priyarksynergy
0

हवेत जास्तीत जास्त पाण्याची वाफ असू शकते हे हवेच्या तापमानावर अवलंबून असते.

Explanation:

  • हवेला 100 टक्के सापेक्ष आर्द्रतेवर संतृप्त म्हटले जाते जेव्हा त्या विशिष्ट तापमानात आर्द्रतेचे प्रमाण जास्तीत जास्त असते.
  • 20 डिग्री सेल्सिअस तापमानात दिलेली हवा 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा दुप्पट पाण्याची वाफ वाहून नेऊ शकते.
  • सापेक्ष आर्द्रता (RH) हे हवेमध्ये पाण्याची वाफ किती आहे आणि ती संपृक्त झाल्यावर हवा किती आर्द्रता टिकवून ठेवेल याचे गुणोत्तर आहे, तर बाष्प दाब तूट (VPD) हा या दोघांमधील फरक आहे.
  • वातावरणातील पाण्याची बाष्प सामग्री ठिकाणाहून आणि वेळोवेळी बदलते कारण हवेची आर्द्रता-धारण क्षमता तापमानाद्वारे निर्धारित केली जाते.
Similar questions
Physics, 10 months ago