hey friends here is your Question
make essay for *mother* in marathi
*Aai*
and follow me if u proud to be a maharashtrian or marathi..!
Answers
hey here is your answer :-
समुद्राची शाई, हिमालयाची लेखणी व आकाशाचा कागद करून आईचे गुणगान लिहिण्यासाठी बसलो तरी आईची माया लिहून संपणार नाही. म्हणूनच तर म्हणतात ‘आई’ ही दोन अक्षरे हृदयाच्या मखमली पेटित जपून ठेवली पाहिजेत. आपल्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंत आपल्या मुलाच्या सर्व व्यथा फक्त आणि फक्त आपली आईच समजू शकते.
आपल्या कल्याणासाठी आई रागावते पण त्यामागच्या भावना मात्र फार वेगळ्या असतात. आईच्या मायेतच इतकी ताकद आहे की रागापेक्षा अवखळपणे केलेले प्रेम अधिक लक्षात राहते. जगातील कशाचीही जखम भरून काढता येईल पण आईच्या विरहाची कमतरता कधीच भरून काढता येणार नाही.
पण मग तो दिवस येतो, जेव्हा आपण शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरा बाहेर पडतो. आता कोणी ओरडायला नाही, किती मज्जा ना. असते खरंच मजा, पण पहिले दोन दिवस फक्त. आणि मग ते मेस चे जेवण, चुकून कापलेलं बोट, आईची आठवण काढते. आता तर मोठे झालो आहोत म्हणून अश्रू रोखतो, पण नंतर ढसा ढसा रडतो. घराचे वेध
कॉलेज सुरु होऊन चार दिवस नाही झाले तर लगेच घराकडे पळ काढतो. आई शेवटी आई असते, तिला कळत तुम्ही का आला आहात, तुम्ही आता मोठे झालात, मान्य करणार नाही की आईची आठवण आली. पण आईला ते माहित असत. बाबा ओरडतात, आई काहीही बोलत नाही. स्वयंपाक घरात तुमचे आवडते जेवण, गोड धोड बनवत असते. अशी असते आई.
पण आताच्या आधुनिक जगात आपण इंटरनेट, सोशिअल मीडिया च्या जाळयात असे काही गुंततो की आई वडिलांचे प्रेम कधी कळतच नाही. ज्यांनी हजारो रुपये भरून, दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून इंग्लिश मिडीयम शाळेत टाकले अशा आई, वडिलांना इंग्रजी येत नसेल तर आपल्याला त्यांची लाज वाटते. सोशिअल मीडिया वर कूल वाटण्यासाठी, हैप्पी मदर्स डे ची आई सोबतची सेल्फी पोस्ट करतो, पण आईला कधी सामोरा-समोर विश करत नाही. आई स्वयंपाक घरात भांडी घासत असते आणि आपण सेल्फी वरचे लाइक्स मोजत असतो. एक प्रश्न विचारा स्वतःला, आई वडिलांची किंमत मात्र सेल्फी एवढीच राहिली आहे का?
या २१ व्या शतकात, स्त्रियाही उच्च शिक्षण घेत आहेत, घरा बाहेर पडत आहेत, नोकरी करत आहेत. वडिलांसारखेच आई ही घराची जबाबदारी घेत आहे. स्त्री आता पुरुषांच्या समान आहे. मला तर, नोकरी करून घर सांभाळणाऱ्या आईचे कौतुक वाटते. घर, मुलं, नाती सांभाळणंच इतकं कठीण असते, ही सारी कर्तव्य पार पाडून ती आई नोकरी पण करते.
if u like it
plz mark it as brainlist
I don't know Marathi sorry