Hindi, asked by prateekpopale, 3 months ago

इ) 'माझा आवडता प्राणी' या विषयावर निबंध लिहा.​

Answers

Answered by nemaneshreya111
7

Explanation:

प्रत्येकाला वाटते की माझ्या जवळ एक छानसा पाळीव प्राणी असायला हवा मुख्य म्हणजे पाळीव कुत्रा. खरं म्हटले तर कुत्रा सारखा पाळीव प्राणी इतर कुणी नाही कारण ते त्याच्या अंगी असलेले गुण पाहून मानव देखील लाजेल.

वफादार आणि इमानदार हा शब्द ऐकताच आपल्या मनात सर्वात आधी प्राण्यांचा विचार येतो आणि मुख्य तर कुत्र्याचा, ते म्हणतात ना वफादारी शिकावी तर कुत्र्याकडून. कुत्रा हा खूप प्रेमळ आणि जिवलग मित्र सारखा प्राणी असतो. तो त्याच्या मालकाविषयी निष्ठावंत आणि प्रेमळ असतो कारण त्याच्या मनात धोका, फसवणूक नावाचा शब्दच नसतो.

माझ्याकडे सुद्धा एक कुत्रा आहे आणि आमच्या घरात कुणीच त्याला कुत्रा म्हणून हाक मारत नाही कारण तो आमच्या घरातील एका सदस्य प्रमाणे आहे. मी त्याला माझा मित्र मानतो आणि मी त्याचे नाव रॉकी असे ठेवले आहे. कारण तो दिसायला खूप सुंदर आणि डॅशिंग आहे म्हणून.

माझा कुत्रा डोबरमॅन जातीचा आहे, ह्या जातीतील कुत्र्यांची शेपूट नसते, त्यांचे कान उभे असतात, जास्त करून ते लाल आणि काळया रंगात आढळतात आणि ते खूप चंचल असतात.

रॉकी ची गोष्टच वेगळी आहे कारण तो आमच्या घरातील सर्वांचा लाडका आहे. त्याची आणि माझी खूप चांगली मैत्री आहे आणि तो माझे सर्व काही ऐकतो. तो खूप हुशार आहे, आपण बोललेले त्याला सर्व समजते. जर मी त्याला शेक हँड्स असे म्हटलो की लगेच तो आपल्या पुढील पायाचा पंजा माझ्या हातात देतो आणि अश्याप्रकरे हस्तांदोलन करतो. घरातील सर्वांचे तो काम ऐकतो त्यामुळे तो सर्वांचा लाडका आहे.

रॉकी माझ्यासोबत खूप खेळतो, त्याला रोज बाहेर खेळायला घेऊन जावे लागते. क्रिकेट हा खेळ त्याला खूप आवडतो, मी बॉल दूर फेकल्यावर लगेच धावत जाऊन बॉल आपल्या तोंडात पकडून परत माझ्या जवळ आणतो.

कुत्रा पाळणे सोपे काम नाही कारण माझ्या कुत्र्याची रोज निगा राखावी लागते जसे त्याची रोज अंघोळ करावी लागते, रोज त्याला जेवण द्यावे लागते, रोज त्याला बाहेर फिरायला न्यावे लागते आणि अजून खूप काळजी ठेवावी लागते. त्याला रोज सकाळ संध्याकाळ फिरायला न्यावे लागते आणि नाही नेले तर तो बळजबरीने घेऊन जातो.

असं नाही की तो फक्त डॉग फूड खातो तर तो आपल्यासारखे खाद्य सुद्धा खातो जसे पोळी चपाती, भात, भाकर, दूध पोळीचा काला, डाळ भात आणि इतर अजून काही.

रॉकी घरात असतो त्यामुळे आम्हाला कधीच बोर होत नाही कारण तो आमच्याशी मस्त्या करतो आणि सतत आमच्या जवळ येऊन बसतो. त्याला झोपण्यास देखील एक स्वतंत्र जागा केली आहे तरी तो कधी कधी माझ्या जवळ येऊन झोपून जातो.

तो आमच्या घरातील एक खंबीर सदस्य आहे कारण तो जेवढा प्रेमळ आहे तेवढाच तो कठोर देखील आहे. रात्री तो आमच्या घराचे रक्षण करतो आणि चोर भुरटे यांना जवळ येऊ देत नाही. तो असल्यामुळे आम्ही निवांत झोपतो कारण आमच्या इथे त्याला सर्वजण घाबरतात.

आमचा रॉकी माझा खूप साऱ्या मित्रांना ओळखतो त्यामुळे तेही त्याच्याशी खेळतात आणि त्यांना तो खूप आवडतो. माझे मित्र घरी आले की त्याला खूप मज्जा वाटते आणि तो सतत आमच्यात येऊन बसतो आणि खूप मस्ती करतो.

निष्कर्ष

जगातील खूप साऱ्या गोष्टींपैकी प्राणी हे एक सुंदर कलाकृती आहे कारण हे जग त्यांच्या शिवाय पूर्णच झाले नसते. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला कदर असायला हवी कारण त्याच्या शिवाय सर्वकाही व्यर्थ आहे. जर तुम्ही सकारात्मक नजर ठेवली तर तुम्हाला देखील सर्वकाही सकारात्मक दिसेल.

कुत्रा म्हटल की इमानदार आणि वफादार ही गोष्ट आपल्याला शिकायला मिळते कारण प्राण्यांपेक्षा इमानदार जास्त कोणीच नसते. आपण प्राण्यांचा आदर करायला हवा, आजकाल खूप सारे लोक प्राण्यांचे हाल करतात, त्यांना त्रास देतात तर ते पूर्णपणे चुकीचे आहे कारण ते आपले नाव घेत नाही तर असे नाही की आपण त्याचा फायदा उचलायला हवा. कारण त्या प्राण्याला जर आपण जीव लावला तर तो आपल्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार होऊन जातो.

पाळीव प्राणी आल की तर कुत्रा हा पहिले आपल्या मनात येतो कारण तो आपल्या मालकावर खूप प्रेम करतो.

असेच मी माझ्या पाळीव कुत्र्याबद्द्दल थोडक्यात वरील माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध ह्यात सांगितले आहे. आणि जर तुम्ही my favourite animal dog essay in marathi ह्या शोधात असाल आणि आपल्याला आपल्या मनासारखी माहिती मिळत नसेल तर वरील निबंध फक्त आपल्यासाठी आहे.

Answered by policepatildharsang
1

माझा आवडता प्राणी वाघ आहे ।

वाघ हा एक जंगली प्राणी आहे । वाघाला नारंगी , पांढरा व काळा ररंगाच्या रेगा असतात । वाघ आंतरराष्ट्रीय प्राणी आहे

Similar questions