I want a marathi essay on importance of cleanliness of 1000 words. Please...Please
Answers
Explanation:
आपले अस्तित्त्व हे इतर प्राण्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. इतर प्राणी नैसर्गिकरित्या सुरक्षित असतात. त्यांना अती स्वच्छतेची गरज भासत नाही. परंतु माणूस हा स्वच्छतेने बांधला गेला आहे. काही दिवस अंघोळ जरी केली नाही तरी शरीराचा दुर्गंध येऊ लागतो. घरातील साफसफाई केली नाही तर रोगराई, आजार, अस्वच्छता आसपास पसरते. त्यासाठी शरीर आणि परिसर स्वच्छ राखणे महत्त्वाचे आहे.
आज समाजात स्वच्छता नसल्याने गंभीर परिस्थिती उत्पन्न झाली आहे. कचरा व्यवस्थापन ही बाब सातत्याने समोर येऊ लागली आहे. सरकार आणि सामाजिक यंत्रणा त्यासाठी कार्यरत असतेच! पण अत्यंत प्राथमिक स्तरावर म्हणजे व्यक्तिगत स्तरावर देखील स्वच्छतेबाबत सजग असणे गरजेचे आहे. स्वच्छता आपण कशी राखू शकतो किंवा काय तरतुदी करता येतील याचे विश्लेषण आपण करू शकतो.
प्रथमतः आपण कुटुंबापासून सुरुवात करू शकतो. प्रत्येकाच्या घरी कचरा साठत असतो. त्यानुसार कचरानिर्मूलन कशा पद्धतीने होत आहे ते पाहूया. ओला कचरा आणि सुका कचरा व्यवस्थापन हे दोन वेगवेगळे घटक आहेत. सुका कचरा आपल्याला जाळता येऊ शकतो आणि ओला कचरा आपण जैविक खतासाठी वापरू शकतो. खतनिर्मिती आणि रासायनिक पदार्थांचा निचरा हा योग्यरीतीने करता येऊ शकतो.
घरात कचरा असेल तर स्वतः झाडू घेऊन तो स्वच्छ केला पाहिजे. प्लास्टिक कचऱ्याचे लवकर विघटन होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर टाळणेच चांगले! सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वतःहून घाण न करणे, परिसरात कचऱ्याची कुंडी ठेवणे आणि त्यातच कचरा टाकणे, असे काही मुख्य हेतू ठेऊन तुम्ही त्याची अंमलबजावणी सामाजिक स्तरावर देखील करू शकता. त्यामुळे एका स्वच्छ समाजाची, गावाची, आणि शहराची निर्मिती होऊ शकते.