I want an essay on be kind to animals in marathi
Answers
Answered by
2
कुत्रा हा पाळीव प्राण्यांपैकी सर्वात लोकप्रिय प्राणी आहे. विविध प्रकारे तो माणसांची मदत करतो त्यामुळे माणसांचा खरा मित्र म्हणून प्रसिद्ध आहे.कुत्रा हा इमानदार प्राणी आहे ज्याचा उपयोग घराची राखण करण्यासाठी, संरक्षणासाठी, शिकार करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासणीमध्येही करतात. याशिवाय काही कुत्रे आंधळ्या व्यक्तींना, आजारी व्यक्तींना मदद करण्यासाठी प्रशिक्षित असतात.जगभरात कुत्र्यांच्या सुमारे ४०० हून अधिक जाती आहेत. ग्रेहाउंड, जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन, बुलडॉग, लॅब्रेडोर, अल्सेशियन, बुलटेरिअर, पोमेरेनियन, रिट्रिव्हर या काही प्रसिद्ध पाळीव कुत्र्यांच्या जाती आहेत.कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता, ऐकण्याची क्षमता अतिशय उत्तम असते. कुत्रा २४ मीटर अंतरावरील आवाजही स्पष्ट ऐकू शकतो. त्यांची नजर तीक्ष्ण असते परंतु त्यांची रंग ओळखण्याची क्षमता कमी असते.कुत्र्याला उत्तम पोहता येते परंतु तो झाडावर चढू शकत नाही. कुत्र्यांचा पळण्याचा सरासरी वेग ताशी एकोणीस मैल आहेकुत्रे सतत जीभ बाहेर ठेवतात व जिभेवरील लाळेच्या बाष्पीभवनामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास त्यांना मदत होते.कुत्रा हा सस्तन प्राणी वर्गातील असून, कुत्र्याची मादी एका वेळीस आठ ते दहा पिल्लांना जन्म देते. पिल्लू जन्मतः असहाय असते तेव्हा मादी त्यांची काळजी घेते. पिल्लांचे डोळे जवळपास एकवीस दिवस बंद असतात. उभे कान असलेले पिल्लू आक्रमक कुत्रा बनते व खाली पडलेले कान असलेले पिल्लू सहसा तुलनेत सौम्य स्वभावाचे असते.कुत्र्यांना पुढील पायाला पाच आणि मागील पायाला चार नखे असतात. परंतु काही कुत्र्यांना यापेक्षा जास्त असू शकतात. ज्या कुत्र्यांना जास्त नखे असतात ते जास्त चतुर समजले जातात.कुत्रे त्यांच्या क्षेत्राबाबत खूप संवेदनशील असतात व तिथे अनोळखी व्यक्ती किंवा इतर कुत्र्यांचा प्रवेश त्यांना सहन होत नाही, आणि हि बाब ते गुरगुरणे, भुंकणे, अंगावर धावून जाणे या प्रकारे व्यक्त करतात.काही कुत्रे पूर्णतः मांसाहारी असतात तर काही कुत्रे शाकाहारी खाद्य सुद्धा खातात. पूर्णतः मांसाहारी कुत्रे जास्त आक्रमक असतात.हाउंड जातीचे कुत्रे अनेक तासानंतर सुद्धा वासाने शिकाराचा माग काढू शकतात त्यामुळे हे कुत्रे शिकारीसाठी उत्तम सोबत आहेत. अल्सेशियन आणि डॉबरमॅन हे कुत्रे घराची राखण करण्यासाठी उपयोगी येतात. बर्फाळ प्रदेशात स्लेज गाडी ओढण्यासाठी सुद्धा कुत्र्यांचा उपयोग केला जातो.कुत्र्यांचे आयुष्यमान सुमारे १० ते १४ वर्षे असते.
Similar questions