Hindi, asked by soniya7, 1 year ago

I want Marathi essay on maza avadata Chand

Answers

Answered by tejasmba
1469

माझा आवडता छंद

छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड. प्रत्येकाला वेगळा वेगळा छंद असतो. मला आहे वाचनाचा छंद. लहानपणीच मला वाचनाचा नाद लागला. नेमका कसा व केव्हा हा नाद मला लागला हे मला आठवत नाही.

आमच्या शाळेत वाचनालय होते. जेवनाच्या सुट्टीत, खाली तासात आम्ही मित्र तिथे जायचो व जे मनाला वाटेल ते वाचायचो. कधी वर्तमान पत्र तर कधी मासिक. यामुळे वाचनाची ओढ वाढतच गेली.

वाचनालयातून आम्हाला प्रत्येक आठवळ्यात दोन गोष्टींच्या पुस्तका मिळायच्या. ती वाचून त्या गोष्यीचा सारांश आम्हाला आमचे सर वर्गात विचारायचे. आणि त्याकरता आम्ही गोष्टीच्या पुस्तका वाचायला शिकलो आणि तोच माझा छंद झाला असेल कदाचित.

माझ्या या वाचनाचा छंद बाबांना कळला व त्यांनी मग गावातील सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचा खाता उघडला. मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. पण या छंदामुळे मी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलय. आधी शाळेचा अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते वाचायच.

वाचनाचा छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात जाताना तर पुस्तकच माझे सोबती असतात. या छंदामुळे मला जगात घडत असणारी सर्व घटनांची माहिती मिळते. माझा ज्ञानात ही वृद्धी होत असते.

माझ्याकडे सर्वप्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्यात गोष्टीच्या पुस्तका, मासिक, कांदबरी व खुप काही वाचन सामग्री आहे. मला केवळ मराठीतील नाही तर हिंदी व इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचायला आवडते.
Answered by raax353
26

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता छंद मराठी निबंध बघणार  आहोत. प्रत्‍येक जण आपल्‍या आवडत्‍या छंदातुन आनंद शोधण्‍याचा प्रयत्‍न करत असतो.कुणाला छंद असतो शिकारीचा, तर कुणाला छंद असतो गडकिल्ले हिंडण्याचा. कुणाला छंद असतो पोस्टाची तिकिटे, नाणी किंवा विविध जुन्या वस्तू गोळा करण्याचा. कुणी मित्र गोळा करून पत्ते कुटत बसतात. तर कुणी एकटेच सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र करतात; तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्रे खेचतात. माझा छंद तसा जगावेगळा आहे. मला लहानपणापासून आवड आहे ती माणसे जोडण्याची आणि जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी माझी ही आवडही वाढत गेली.

तसे पाहता आमचे कुटुंब फार छोटे आहे. आई, बाबा आणि मी. पण अगदी लहानपणापासून मला आपल्या घरी खूप माणसे यावीत, गर्दी व्हावी, गडबड उडावी असे वाटे. आई सांगते की, मी लहानपणी आपल्याकडे 'हळदीकुंकू' कर, 'सत्यनारायणाची पूजा' कर असा नेहमी हट्ट करीत असे. कारण त्यामुळे घरात खूप माणसे येत. सुट्टीचा वार रविवार वा सुट्टीचा 'मे' महिना मला फार प्रिय आहे. कारण सुट्टीमुळे खूप पाहणे घरी येतात. सुट्टी येण्यापूर्वीच मी माझ्या आप्तांना, मित्रांना आमंत्रणे पाठवितो. त्यांना वाटते की किती विनम्र, लाघवी मुलगा आहे. पण माझे माणसवेड त्यांना 'अनभिज्ञ' असते.

मला आवडतात ती माणसे फक्त नात्यागोत्याचीच अथवा आपल्या योग्यतेची असतात असे नाही हं! मला कोणतीही माणसे आवडतात. आम्ही राहतो त्या कॉलनीत आमचा बंगला पहिला बांधला गेला. इतर सतरा बंगले नंतर आमच्या देखत बांधले गेले. तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो; भरपूर मोकळा वेळ असे. त्यावेळी बांधकाम करणाऱ्या माणसांशीही मी दोस्ती करीत असे. बांधकामावर खूप स्त्रिया असत. त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुले असत. या मुलांबरोबर मी खूप खेळत असे. त्यांच्याकडूनच मी विटीदांडूचा खेळ शिकलो. ही मुले लहान वयातही आपल्या आईवडिलांना केवढी मदत करीत. आज ती मुले वयाने मोठी होऊन पुरुष झाले आहेत, त्यांच्यातील कित्येकजण स्वतंत्र कामे करू लागले आहेत.

Explanation:

Similar questions