India Languages, asked by debashispanda2572, 10 months ago

I want science essay in marathi

Answers

Answered by shriyaalwe09
0

विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे.

२ विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.

३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. (अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही.)

४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.

५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच किती तरी शतकांपासून लाखो-करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत व त्यात आपले योगदान देऊन त्याला व स्वत:ला समृद्ध करत आली आहेत. हा ‘खेळ’ तो खेळणाऱ्यांसाठी जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे.

६. विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण ‘तंत्रज्ञान’ म्हणतो.

विज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे होत असते. त्यातील कोणताही तुकडा सुटा नसतो, तर तो इतर तुकडय़ांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते (किंवा असायला हवी). विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. ते शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञानच. काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभिबदू – गृहीतक – ठरविणे. त्यानंतर या दोन िबदूंना सांधणारा रस्ता प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धती तपासून पाहणे व नव्याने सुरुवात करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते व तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयापासून जर आपण अंतर घेतले नाही, तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूकपणे करणे आपल्याला शक्य होणार नाही. (वैज्ञानिक पद्धतीबद्दल आपण पुढच्या लेखात सविस्तर बोलणार आहोत.)

नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान

स्थूलमानाने विज्ञानाचे दोन भाग पडतात – नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान. काटेकोरपणे व तटस्थपणे प्रयोग व निरीक्षण करणे हे नैसर्गिक विज्ञानाच्या बाबतीत शक्य होते. त्यातील निष्कर्ष अनेकदा गणिती सूत्रांच्या साच्यात बसविता येतात, कारण निसर्गातील क्रिया-प्रक्रिया या नियमबद्ध असतात; परंतु समाज ही मानवाची निर्मिती असल्यामुळे त्याच्या रचनेत किंवा कार्यपद्धतीत काटेकोरपणा नाही, नेमकेपणा नाही. समूहाचा स्वभाव व व्यवहार यांविषयी नेमकेपणाने सांगणे कठीण असते. सामाजिक शास्त्रांमधील गृहीतके, माहिती (डेटा) संकलन व विश्लेषण यांच्या पद्धती, सिद्धांत यांच्याबद्दल सामाजिक वैज्ञानिकांत मोठय़ा प्रमाणात मतभेद आढळतात. काही प्रकारचे प्रयोग करणे सामाजिक शास्त्रात शक्य होत नाही किंवा नैतिकदृष्टय़ा ते इष्ट ठरणार नाही. उदा. समाजातील वाढत्या दहशतवादाचा लहान मुलांवर काय परिणाम होईल हा विषय अभ्यासाला चांगला आहे; पण त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी मुलांच्या एका गटाला सतत दहशतवादाच्या दडपणाखाली ठेवणे हे नैतिकतेच्या निकषात बसणार नाही. शिवाय सामाजिक वैज्ञानिकांच्या विश्लेषणाच्या कसोटय़ा वेगवेगळ्या असू शकतात. उदा. एकाच घटनेचे वर्ग, जात, लिंगभाव या वेगवेगळ्या कसोटय़ांवर केलेल्या विश्लेषणाचे निष्कर्ष अर्थातच वेगवेगळे येतील. म्हणून आपल्या अभ्यासात आपण शक्यतो नैसर्गिक विज्ञानाच्या संदर्भातच बोलू. अर्थात, आपण जेव्हा समाजाच्या भूमिकेतून विज्ञानाची समीक्षा करू, तेव्हा तो सामाजिक विज्ञानाचा भाग असेल. म्हणून त्यात मते-मतांतरे होतीलच; पण त्याचाच अर्थ हा विषय खूप ‘इंटरेस्टिंग’ आहे असा होत नाही का?

Similar questions