India Languages, asked by kippehgamer, 5 hours ago

i want short speech on marathi poem santvani standard 9​

Answers

Answered by nishataneja5678
0

Answer:

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।१।।

पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।

तैसें माझें मन वाट पाहे ।।२।।

दिवाळीच्या मुळा लेंकीं आसावली ।

पाहातसे वाटुली पंढरीची ।।३।।

भुकेलिवा बाळ अति शोक करी ।

वाट पाहे उरि माउलीची ।।४।।

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।

शब्दार्थ :

भेटीलागीं – भेटीसाठी – for meeting

जीवा – मनाला, प्राणाला – to the soul

आस – तीव्र ओढ,  इच्छा, अपेक्षा, आशा – desire

मुळा – निमिताने – on the occassion

लेंकी – मुलगी  – daughter

आसावणे – आतुर होणे, व्याकुळ होणे – to eagerly wait

वाटुली – वाट, मार्ग, रस्ता – a way, a path

भुकेलिवा – भुकेलेले – one who is hungry

शोक – दुःख – sorrow

उरी –  मनात, हृदयापासून – from the heart

तुका – संत तुकाराम – Saint Tukaram

मज – मला – to me

माउली – आई, मुख – चेहरा – the face

दावी – दाखव – show

वाक्प्रचार :

आस लागणे – उत्कंठा लागणे, इच्छा होणे

वाट पाहणे – प्रतीक्षा करणे

शोक करणे – दुःख करणे, आकांत करणे

कवितेचा परिचय:

प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टान्तातून व्यक्त केली आहे.

Central Idea of the devotional song:

In this devotional song, Saint Tukaram through various examples, expresses his strong desire to meet Vittal whom he considers as his mother.

भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।१।।

भावार्थ:

संत तुकाराम महाराजांना विठ्ठल माऊलीची तीव्र ओढ लागली आहे त्यामुळे ते म्हणतात, हे विठ्ठलमाऊली, माझ्या मनाला तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे त्यासाठी मी तुझी रात्रंदिवस वाट पहात आहे.

My soul has the ardent desire to meet Vittal and so I am waiting day and night to meet him.

पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।

तैसें माझें मन वाट पाहे ।।२।।

भावार्थ:

चकोराला फक्त चांदण्याची आस असते. तो चंद्रप्रकाश सेवून जगतो, चंद्रकिरणे हेच त्याचे जीवन असते. चकोराला जशी चंद्रकिरणांची ओढ असते, त्यासाठी तो तळमळत असतो. चकोराला जसे चांदणे ही एकमेव गोष्ट हवी आहे. त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे माझे मन तुझी वाट पाहत आहे.

The chakor bird lives by savouring the moonlight from the full moon. And Just like the chakor bird waits for the full moon, so also my soul is waiting to meet Vittal.

दिवाळीच्या मुळा लेंकीं आसावली ।

पाहातसे वाटुली पंढरीची ।।३।।

भावार्थ:  

माहेराला जाण्यासाठी दिवाळीच्या सणाची संसारी मुलीला वाट पाहावी लागते, त्याप्रमाणे हे विठ्ठला, तू माझे माहेर आहेस. पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहतो आहे.

Just like a married daughter is restless to go to her maternal house on the occasion of Diwali, so also I am eagerly waiting to go to Pandarpur to meet my mother Vittal.

भुकेलिवा बाळ अति शोक करी ।

वाट पाहे उरि माउलीची ।।४।।

भावार्थ:

भुकेला बाळ जसा आईकडे हट्ट धरतो, खायला द्यावे म्हणून आक्रोश करतो. त्या प्रमाणे विठ्ठला तू माझी आई आहेस व मी तुझे बाळ आहे. विठ्ठलरूपी मातेची मी मनापासनू वाट पाहत आहे.

Just like a hungry baby is wailing for food, so also my heart is yearning for my mother Vittal.

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।

भावार्थ:

संत तुकाराम महाराज म्हणतात – हे विठ्ठला, तुझ्या भेटीची मला भूक लागली आहे. आता धावत ये आणी तुझे श्रीमखु मला दाखव. तुझ्या दर्शनाची आस मला लागली आहे.

Tukaram says, I feel the burning hunger of meeting you, so come running and show me your graceful face O Vittal!

Explanation:

This might bd your answer

I am sleepy good night

Similar questions