if their was no lettle essay in marathi
Answers
Explanation:
मला माझी आई
मला माझी आई खूप आवडते कारण ती माझी खूप चांगली मैत्रीण देखील आहे. माझी आई नेहमी माझी काळजी घेते. ती रोज सकाळी आमच्यासाठी नाश्ता बनवते आणि माझा शाळेचा डब्बा चविष्ट पदार्थांनी भरून देते.
ती रोज सकाळी सर्वांच्या उठण्याधीच सर्व व्यवस्था करून ठेवते. माझी आई माझे स्वास्थ आणि जेवणाची खूप काळजी करते. ती तिच्या मोकळ्या वेळात मला माझ्या शाळेच्या होमवर्क मध्ये सुद्धा मदत करते.
मला माझ्या आई सोबत बाजारात जायला खूप आवडते. माझी आई आमच्या सर्वांच्या गरज व इच्छांची खूप काळजी करते. आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती स्वतः कडे सुद्धा दुर्लक्ष करते. माझी आई माझ्या सर्व गोष्टी बद्दल चिंतित असते व तिला कायम माझी काळजी लागलेली असते.
ती कधीही मला कंटाळा येऊ देत नाही. जरी ती दिवसभर घरात कामे करीत असली तरीही ती कधीही या बद्दल तक्रार करीत नाही. ती कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते
आई ही खरोखर परमेश्वराने दिलेले सर्वात चांगले उपहार आहे. मी कायम तिचे आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असतो.