Hindi, asked by saurabh4589, 1 month ago

इकडे खूप गर्दी आहे. ( प्रत्येक शब्दाची जात ओळखा​)​

Answers

Answered by sonalishirsat007
4

Answer:

मराठी शब्दाच्या जाती

नाम - जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.

उदाहरण - घर, आकाश, गोड

सर्वनाम - जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरण - मी, तू, आम्ही

विशेषण - जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.

उदाहरण - गोड, उंच

क्रियापद - जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.

उदाहरण - बसणे, पळणे

क्रियाविशेषण - जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.

उदाहरण - इथे, उद्या

शब्दयोगी अव्यय - जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी

उभयान्वयी अव्यय - जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - व, आणि, किंवा

केवलप्रयोगी अव्यय - जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - अरेरे, अबब

Answered by srohini9977
5

Answer:

हे बरोबर उत्तर आहे शब्दांच्या जाती चा

Attachments:
Similar questions