History, asked by shreyaruhegde, 4 months ago

impacts of corona virus on our life in marathi language essay​

Answers

Answered by anviyadav077
4

Answer:

आज ‘कोरोना’शी लढतो आहोत. उद्या आणखी कुठल्यातरी आजाराशी लढावे लागेल. म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन पुन्हा लढत बसायचे की निसर्गाशी जुळवून विकास साधायचा, हे आपण ठरवायचे आहे|

गजानन दिवाण, उप वृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबादनिसर्गासाठी वेगळे काही करण्याची अजिबात गरज नाही. आपण निसर्गामध्ये फारशी लुडबुड न करणे हेच त्याच्यासाठी खूप काही केल्यासारखे आहे; पण माणसाचा स्वभाव फार विचित्र म्हणायचा. उदाहरणार्थ विकासाच्या नावाखाली हजार झाडे पैसे खर्चून तोडायची आणि त्याची भरपाई म्हणून लाखो रुपये खर्चून दुसरीकडे ती लावायची. यामुळे आपले समाधान भले होत असेल. निसर्गाची हानी त्यामुळे भरून निघत नाही. आताच्या ‘कोरोना’ संकटाने ते दाखवून दिले आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात माणसाने निसर्गात काहीच लुडबुड न केल्याने अलीकडच्या काही वर्षांत यंदा प्रथमच वसुंधरेने मोकळा श्वास अनुभवला असावा.

Similar questions