India Languages, asked by gaikwadritika01, 8 months ago

importance of farmers in marathi

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

प्रस्तावना

आमचा भारत देश कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतेक लोक हे गावात राहतात. भारत हा गाव – गावांचा देश आहे. गावातील लोकांचा शेती का मुख्य व्यवसाय आहे. हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे.

या शेतीवरच शेतकऱ्याचा उदर निर्वाह होतो. जर या शेतकरी बंधूने काही पिकवल नाही तर आपल्यावर उपाशी राहायची वेळ येईल. आम्ही सर्व आपले जीवन जगू शकणार नाही.

जगाचा पोशिंदा

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. तो दिवसभर आपल्या शेतात राबून खूप मेहनत करतो आणि सगळ्यांसाठी धान्य पिकवतो. म्हणूनच तर म्हटले आहे कि,

“मेरे देश कि धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश कि धरती”

यासारख्या ओळी ओठांवर येतात. जर शेतकरी सुखी असेल तर हे जग सुखी राहील. त्याच बरोबर “जिथे राबती हाथ तेथे हरी” अशी शेतीच्या महतीची वचने आपण कौतुकाने लिहतो, बोलतो आणि ऐकतो. तसेच लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले आहे “जय जवान, जय किसान.” म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो.

शेतीची प्रथम सुरुवात

मानवाने सगळ्यात प्रथम जेव्हा शेतीची सुरुवात केली तेव्हा डोंगर – टेकड्यांवर लाकडाच्या साहाय्याने शेती करीन धान्याची निर्मिती केली.

Similar questions