Computer Science, asked by sharmanaman4586, 11 months ago

Importance of trees in human life simple and easy essay in Marathi

Answers

Answered by basavaraj5392
1

Answer:

वृक्ष (निबंध) -

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या तुकारामांच्या ओवीचा कधी विचार केलाय, करायलाच पाहिजे.

वृक्ष(झाड) हा मनुष्यजीवणाचा एक अविभाज्य धटक बनला आहे. झाडे आपल्याला फळे-फुले देतात. झाड अपल्याला सावली देते. ऑक्सिजन पुरवते त्याच्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. वृक्षामुळे हरितगृह परिणाम कमी होतो. झाडांपासून मिळणाऱ्या लाकडाचा इमारत बांधणीसाठी उपयोग होतो. झाडाचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत. जखम झाल्यावर झाडाचा पाला लावता.

परंतु आजकाल वृक्षतोड खूप वाढली आहे. लोक सर्रास झाडांवर कुऱ्हाडी चालवत आहेत. जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. याला आपण आळा घातला पाहिजे. वृक्षारोपण केले पाहिजे. २१ मार्च हा दिवस जागतिक वनदीन म्हणून साजरा केला जातो. आपणही वैयक्तिक स्तरावर दर वर्षी एक झाड लावलं तर एका गावात एक जंगल तयार होईल.

'झाडे लावा झाडे जगवा' हे धोरण सगळ्यानी स्वीकारावे हीच एक विनंती.

धन्यवाद...

Answered by Hansika4871
0

*वृक्षांचे महत्त्व*

*Importance of trees in our lives*

"वृक्षवल्ली आम्हा सोयरी" हे गाणं तुम्ही ऐकल असेलच. ह्याचा अर्थ असा आहे की झाडे म्हणजेच वृक्ष हे आपले नातेवाईक आहेत, व त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे (जशी आपण आपल्या खऱ्या नातेवाईकांची घेतो)

झाडे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. पर्यावरण सुशोबित करणे ह्या व्यतिरिक्त देखील झाडे खूप काही करतात. आपल्या आजूबाजूचा कार्बन डायऑक्साइड सोशून, आपल्याला प्राणवायू देतात. झाडे आपले उनापासून सौरक्षण करतात. झाडे आपल्या मुलांच्या मदतीने, जमिनीला घट्ट धरून ठेवतात ज्याने करून माती पावसात वाहून जात नाही. मंग्ररूव झाडे त्सुनामी पासून आपले सौरक्षण करतात. वरील सगळ्या कारणामुळे झाड आपले मित्र आहेत हे बोळण्याशिवाय पर्याय नाही.

Similar questions