Computer Science, asked by lavania1751, 9 months ago

pehli barish ki dhamaal essay in marathi

Answers

Answered by Hansika4871
0

*पहिल्या पावसातील धमाल*

*Pahili baarish dhamaal essay in marathi*

पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे.पाऊस हा आपल्या पृथ्वीवर आनंद घेऊन येतो कारण पाणी मिळते. शेतकरी आपल्या पिकांसाठी आतुरतेने पावसाची वाट बघत असतो, आणि लहान मुले देखील.वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात ह्यालाच पाऊस म्हणतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो.

मे महिन्याच्या उकाडा नंतर येतो तो जून महिना. मुंबईत जून च्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडायला सुरावात होते. पहिला पाऊस आला की सगळ्यांना खूप आनंदित वाटते. जसा पहिला पाऊस पडतो तेव्हा लहान मुले आपल्या घरातून बाहेर भिजायला पडतात. पहिला पाऊस हा नेहमी चांगला असतो. कागदाच्या होड्या बनविणे हे लहान मुलांचे पावसात मुख्य छंद असतात. अगदी लहान मुले देखील रेनकोट घालून बाहेर पडतात. मोठी माणसं आपल्या कपाटातील छत्र्या बाहेर काढतात व पावसाची तयारी करतात. त्रासलेल्या शेतकऱ्याची व्यथा देखील पावसामुळे नष्ट होते. पहिला पाऊस त्याच्या जीवनात नवीन पीक घेऊन येते.

असा हा पहिला पाऊस सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो.

Similar questions