Environmental Sciences, asked by Arjeet4137, 1 year ago

Importance of water essay in marathi language

Answers

Answered by Adnan2406
282
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

असे वाचवा पाणी

आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण पाणी पितो. सर्वसाधारणपणे पिण्यासाठी पेलाभर पाणी घेतो. मात्र, खूपदा एखाद दुसरा घोट पाणी पिऊन उरलेले पाणी आपण फेकून देतो. हे दृश्य घरी, समारंभात बऱ्याचदा पाहायला मिळते. हे फेकून दिलेले पाणी आपण मोजले, तर आपण पाण्याचा किती मोठ्या प्रमाणात अपव्यय करतो हे कळेल. असा प्रयोग आपण आपल्या घरीही सहज करू शकता. दिवसभरात किती पाणी वाया जाते ते बघा.
बऱ्याचदा कुठेतरी जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. पाण्याचा आवाज ऐका. कुठे पाणी वाहते आहे याचा शोध घेऊन नळ बंद करा.

विनाकारण कोणी पाणी वाया घालवत असेल, तर त्याला समज द्या. जनजागृती करा.

कुंडीमध्ये पाण्याचा ओलावा ठेवू शकता आणि सेंद्रीय कोरड्या तणाचा वापर करा. हे तण ओले करून त्याचे आच्छादन दिल्याने कुंडीतील झाडास पाणी कमी लागते. हे तण ओलावा धरून ठेवते.

घरातील फिशटँक वारंवार धुऊ नका. तो पूर्ण भरत असाल, तर निम्म्याने धुवा. आठवड्यातून काही ठराविक दिवस तो स्वच्छत करण्याचे बंधन पाळा. फिशटँकमधील पाणी कुंड्यांना घाला.



Answered by Anonymous
159

पृथ्वीवरील कोणत्याही जीवित जीवनाची मूलभूत आवश्यकता ही पाणी आहे

मानवी शरीर 70% पाण्याने बनलेले आहे

आपण पाण्याशिवाय राहू शकत नाही

आपल्या रोजच्या कामात आम्हाला पाणी हवे आहे

उदाहरणार्थ:

1)आम्हाला पाणी पिण्याची गरज आहे

2)आम्हाला स्वयंपाक करण्यासाठी पाणी हवे आहे

3)कारखान्याच्या कामात आम्हाला पाणी हवे आहे


आणि बरेच काही...

Similar questions